गुगलची नवी गुगली… आता या तरुण क्रिकेटपटूची पत्नी म्हणून सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा तेंडुलकरच नाव केलं पुढे…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सर्च इंजिन गुगलचे गुगलिंग अव्याहतपणे सुरू आहे.  अलीकडेच अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर रशीद खानच्या पत्नीला गूगल वर सर्च केल्यानंतर, टीम इंडियाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव दाखवल्यानंतर अशीच आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये भारताचा युवा क्रिकेटर शुभमन गिलच्या पत्नीबाबत गुगलवर सर्च करण्यात आले आहे पण गूगल च्या या सर्च रिझल्ट मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे नाव पुढे येत आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. पण या वृत्तांना अजूनतरी दुजोरा मिळालेला नाही. दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकदा लाईक आणि कमेंट करत असतात आणि कधीकधी दोन्ही पोस्टचे कॅप्शन सुद्धा सारखे असतात, त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्याकडे लोकांचे लक्ष आणि उत्सुकता वाढली असल्याचं दिसून येत आहे.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा जुना फोटो होतोय खूपच व्हायरल अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

क्रिकेटपटू शुभमन गिल हा भारतीय क्रिकेट संघाचा एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. शुभमनने भारताला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. टीम इंडियासोबतच शुभमन गिल देखील आयपीएल टीमचा एक भाग आहे.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याबद्दल शुभमन गिल अनेकदा चर्चेत असतो. सारा तेंडुलकरची बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाल्याची बातमीही आता समोर आली आहे.

दरम्यान, एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी बनली आहे. असा दावा आम्ही नाही तर स्वतः गुगलने हा दावा केला आहे. गुगलने त्यांच्या नात्याबद्दल ची अफवा खरी समजून साराला शुभमन गिलची पत्नी असल्याचे सांगितले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा या सगळ्याचा तपास केला गेला तेव्हा असे आढळून आले की गुगलद्वारे लोकांना खूप चुकीच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत.

See also  साताऱ्यातील या आजोबांना दररोज खावे लागतात 250 ग्रॅम दगड, यामागील कारण ऐकून धक्का बसेल!

गुगलवर शुभमन गिलची पत्नी असे सर्च केले तर त्यात सारा तेंडुलकरचे नाव दिसायला लागले. आम्ही तुम्हाला सांगतो की ही फक्त एक अफवा होती, ज्याला गुगलने योग्य असल्याचे समजून घोषित केले होते. तसेच, या दोघांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये अनेकदा हेडलाइन येत असतात. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंटही करतात.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment