‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेत्री अडकणार लवकरच विवाहबंधनात, खूपच उच्चश्रीमंत आहे तिचा होणारा भावी पती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

यंदाच्या वर्षी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. काही महिन्यांपूर्वीच सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अतिशय थाटामाटात लग्न केले. याचे फोटोज् सुद्धा तिने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. सोनाली कुलकर्णी नंतर आता आणखी एक अभिनेत्री सप्तपदी घेण्याच्या तयारीत आहे.

751e4f78d79a241709b78899c60d7640

“गोव्याच्या किनाऱ्यावर” हा अल्बम प्रकाशित झाला. या अल्बमची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मराठमोळी अभिनेत्री सिद्धी पाटणे ही आपल्या या भन्नाट अल्बममुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय झाली. याआधी “सांग तू आहेस का?” या मालिकेत सिद्धीला आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. यामध्ये तिने अतिशय उत्कृष्ट भूमिका साकारली होती.

तसेच “घेतला वसा टाकू नको” या मालिकेतील सिद्धीच्या भूमिकेला देखील चाहत्यांनी पसंती दिली आहे. अभिनेत्री सिद्धी पाटणे हिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त तिने हा फोटो शेयर केला होता. तुम्हांला ठाऊक आहे का, यामध्ये ती आपला बॉयफ्रेंड विशाल दलाल याच्यासोबत दिसत आहे. एवढंच नव्हे तर, विशाल दलाल सोबत लवकरच ती लग्न करणार असल्याचे समजते.

See also  या मराठमोळया अभिनेत्रीने स्वतःचेच जुने कपडे काढले विकायला, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

siddhi03

आपल्या वाढदिवसाचा केक कापताना विशाल सोबत आपण लग्न करणार असल्याचे देखील तिने सांगितले आहे. त्याचबरोबर लग्नाच्या आधीचा विधी सुद्धा तेव्हा करण्यात आला. विशाल दलाल हा खूप मोठा उद्योगपती आहे. तो आर्किटेक्चर चा व्यवसाय करत असल्याचे म्हटले जाते. तसेच तो कोट्यावधी रुपये कमावत असल्याचे म्हटले जाते.

सिध्दी पाटणे हिचे सोशल मीडियावरील हे फोटोज् पाहून तिचे फॅन्स तिला वैवाहिक सुखी संसारासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत. त्याचप्रमाणे सिद्धी व विशाल आपल्या भावी संसाराची स्वप्ने रंगवताना दिसत आहे. मराठमोळी अभिनेत्री सिद्धी पाटणे हिला स्टार मराठीतर्फे पुढील नवविवाहित जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

siddhi02

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment