आजची माता आहे सिद्धिदात्री माता, जाणून घ्या सिद्धिदात्री माताची कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

देवी सिद्धिदात्री माता : सर्व सिद्धी देणारी सिद्धिदात्री. मनोवांच्छित गोष्ट मागण्यापूर्वीच तेही अपेक्षेपेक्षाही जास्त आणि इच्छा होण्यापूर्वीच मिळणे म्हणजे ‘सिद्धी’ प्राप्त होणे. स्व मध्ये स्थिर असणाऱ्यालाच सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होते. तेव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असते. गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या मार्गानेच वाटचाल करावी. माता सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते, असे मानतात. गुरुकृपेमुळे ‘प्रावीण्य आणि मुक्ती’ या माता सिद्धिदात्री ने दिलेल्या देणग्या आहेत.

दुर्गामातेची नववी शक्ती म्हणजे माता सिद्धिदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे, अशी श्रद्धा आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत.

See also  जाणून घ्या महागौरी माताची माहित नसलेली अदभूत कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

देवी माता सिद्धिदात्री त या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात. देवी माता सिद्धिदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. कधी ती कमळाच्या फुलावरही विराजमान असते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे.

देवी माता सिद्धिदात्री ची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी माता सिद्धिदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानतात. या देवीचे व्रत सूर आणि असुर या दोन्हीसाठी पूजनीय असते. ही देवी भक्ताला प्रसन्न झालीच तर त्या भक्ताला २६ वेगवेगळी वरदानं मिळतात, अशी श्रद्धा आहे. हिमालयाच्या नंदा पर्वतावर तिचे तीर्थस्थान आहे.

See also  सूर्य देवाचा स्वाती नक्षत्र प्रवेश महाष्टमीच्या पावन मुहूर्तावर या 7 भाग्यवान राशींचे नशीब सुर्यकिरणांप्रमाणे झळकणार...

माता सिद्धीदात्री पूजनविधी : आजच्या दिवशी या देवीची पूजा केल्याने विद्या, विजय, राजयोगाची प्राप्ती होते. देवीला नऊ वेगवेगळ्या रसांचा प्रसाद दाखवणं, आणि फुलं-फळं दाखवणं श्रेष्ठ समजलं जातं. दुर्गा पूजेच्या या दिवशी विशेष हवन तयार केला जातो. हा नवदुर्गाचा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच, या दिवशी माता माता सिद्धिदात्री नंतर इतर देवतांची (म्हणजे जे आपण घटी बसवले असतात) त्यांचीदेखील पूजा केली जाते. त्यानंतर सर्वप्रथम चौरंगावर तिची मूर्ती ठेवून तिचे पूजन, दुर्गा सप्तशतीचे सर्व श्लोक स्वरूप मंत्र म्हणून हवनांमध्ये आहुती दिली जाते. ‘ओ ह्री खेहीन चामुंडैयी विच नमो नम’ हा बीज मंत्र १०८ वेळा म्हटला जातो. भगवान शंकर आणि ब्रह्मा यांची पूजा केल्यानंतर या खालील दिलेल्या स्तोत्राचे पठण करून शेवटी सर्व देवांची आरती केली पाहिजे.

‘कंचनाभा शखचक्रगदापद्मधरा मुकुटोज्वलो।
स्मेरमुखी शिवपत्नी माता सिद्धिदात्री नमोस्तुते।।
पटाम्बर परिधानां नानालंकारं भूषिता।
नलिस्थितां नलनाऋषी सिद्धीदात्री नमोस्तुते।।
परमानंदमयी देवी, परब्रह्म परमात्मा।
परमशक्ति, परमभक्ति, माता सिद्धिदात्री नमोस्तुते।।
विश्वकर्ती, विश्वभती, विश्वहर्ती, विश्वप्रीता।
विश्व वार्चिता विश्वातीता माता सिद्धिदात्री नमोस्तुते।।
भुक्तिमुक्तिकारिणी भक्तकष्ट निवारिणी।
भवसागर तारिणी माता सिद्धिदात्री नमोस्तुते।।
धर्मार्थकाम प्रदायिनी महामोह विनाशिनी।
मोक्षदायिनी सिद्धीदायिनी माता सिद्धिदात्री नमोस्तुते।।

या स्तोत्राचे पठण करुन हवनामध्ये अर्पण केलेला प्रसाद वाटावा.

See also  आजची नवदुर्गामाता आहे माता ब्रह्मचरिणी, जाणून घ्या माता ब्रह्मचरिणी व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

माता सिद्धीदात्री पूजन महत्त्व : देवी माता सिद्धिदात्री ची पूजा करून, माणसाला सर्व सिद्धी आणि नवनिधी, वैभव, वैभव, प्राप्ती, प्रकाश, प्रतिष्ठा, नम्रता, भक्ती आणि व्यक्तिमत्त्व प्राप्त होते. तिच्या उपासनेमुळे, अशक्य कार्यदेखील शक्य होते. म्हणून तिचा आश्रय घेण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला पाहिजे. देवीच्या मदतीमुळे मोक्ष मिळू शकतो, अशी श्रद्धा आहे.

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment