फायनली मराठी सिनेसृष्टीतल्या सर्वात बेस्ट कपलचा लग्नसोहळा पडला पार, पहा मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटोज!

मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या अभिनेत्यांच्या खऱ्या अस्सल हिऱ्यांपैकी एक म्हणजे सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि तरूणाईच्या ह्रदयावर आपल्या झक्कास अभिनयाने फ्रेशर्स मालिकेतून डॅशिंग रूपात अधिराज्य गाजवणारी मिताली मयेकर. नुकताच या दोन भन्नाट, क्युट आणि मेड फाॅर इच ऑदर अशा कपलचा विवाहसोहळा पार पडला.

गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशीपमधे होते. आणि दोघांच्या इन्स्टाग्राम हॅंन्डलवरून त्यांच्या पोस्टवरून हे वारंवार रसिकांना प्रतित होत होतं. आज फायनली या दोघांची जोडी अगदी धुमधडाक्यात लग्नबंधनात अडकली आहे. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या फोटोंवर भरपूर आशिर्वाद व पुढील इनिंग्जच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही येताना पहायला मिळत आहेत.

खरतरं तस पाहता हा एक बहुचर्चित विवाहसोहळा होता असं म्हणावं लागेल. कारण दोघांच्याही बाजूने अनेकवेळा रिलेशनबद्दल गोष्टी स्पष्ट झाल्याच होत्या. आणि फायनली कुटुंब व काही मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा शुभसमारंभ पार पडला.

चार्मिंग, क्युट मिताली व हॅन्डसम, तगडा सिद्धार्थ आता नव्याने एकमेकांच आयुष्य फुलवण्यास सज्ज झाले आहेत. दोघांच्या साता जन्माच्या गाठीची आतुरता लोकांमधे इतकी होती की, मेहंदीपासून ते लग्नापर्यंतचे सारेच फोटो क्षणभरात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. “सिने गाॅसिप्स” यांनीतर सप्तपदीच्या गोड क्षणांचे फोटोदेखील पोस्ट करून टाकले.

ढेपेवाढा या पुण्यातल्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. खऱ्या अर्थानं अस्सल मराठमोळ्या चालीरितीत लग्नसोहळा पार पडला, मितालीने हिरव्या भरजरी रंगाची नऊवारी साठी नेसली होती तर सिद्धार्थने राॅयल ब्लू रंगाचा कुर्ता आणि धोतर असा लहेजा परिधान केला होता. या सोहळ्यात अभिज्ञा भावे, उमेश कामत व सोबतच इतर कलाकारांनीही हजेरी लावली होती.

मितालीने उर्फी, बेफिकिर, स्माईल प्लीज या सिनेमात काम केल आहे, शिवाय सिद्धार्थ त्याच्या सदाबहार अशा क्लासमेट्स, ऑनलाईन बिनलाईन, गुलाबजाम चित्रपटांमधील भुमिकांमधून प्रेक्षकांसमोर आला आहे. याशिवाय त्याने हिरकणी व इतर सिनेमेही केले आहेत, शिवाय वेबसिरीजमधूनही त्याने आपली छाप रसिकप्रेक्षकांवर उमटवली आहे.

या दोघांच्या जोडीने आजवर मराठी सिनेसृष्टीतल्या रसिकांना भरपूर मनोरंजनात्मक गोष्टी दिल्या आहेत, लग्नानंतर इथून पुढेही दोघांनी अशाचप्रकारे आपल्या कामातून रसिकांच मनोरंजन करावं व सोबतच समाधानी व सुखी आयुष्य जगावं, ह्याच त्यांना या मंगलमुहूर्तावर शुभेच्छा.

 आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment