अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यतील काही आठवणी !
अवघ्या अनाथनवर प्रेम करणारी माई ह्यांना कोण नाही ओळखत हो मी बोलतिये सिंधुताई सकपाळ विषयी काय बोलावं माईनविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे पण सुरवात कुठून करावी कळत नाही आहे. “किसे आपणा बनावू कोई कबिल नही मिलता पँथर बोहोत मीलते लेकीन दिल नही मिलता।” माई ह्या साध्या व्यक्तिमह्त्वाचा आहेत साधेपणा त्याना प्रत्येक गोष्टीत दिसतो माई जरी 4 थइ पास असल्या तरी त्या उत्तम वक्त्या आहेत त्यानी “मी वनवासी” नावच पुस्तक स्वतः लिहल आहे त्यांच ते पुस्तक कर्नाटक मध्ये 10 चा अभ्यासक्रमात आहे.
खर तर माईंचं आयुष्य खूप खडतर त्यांचा एवढं दुःख कोणी पाहिलं ही नसेल आणि अनुभवलं ही नसेल त्या स्वतः म्हणतात “नसीब से जादा और समय से पहले कुछ नही मिलता।” अवघ्या खेळन्याबागडण्याचा वयात म्हणजे 9 व्या वर्षी त्यांचं लग्न झालं तेही 35 वर्षेचा माणसाशी लग्नातर सासरच्या माणसांकडून तसेच नवऱ्याकडून ही खूप हाल अपेष्टा सहन केल्या पाहिलनद्या त्या गरोदर होत्या तेव्हा सासरच्या माणसांनी त्याना 9व्या महिण्यात पोटावर लाथा मारून गाईचा गोठयात फेकून दिले.
त्या वेळी त्या बेशुद्ध अवस्थेत त्यानी मुलीला जन्म दिला कोणी नव्हतं त्या वेळी त्याचा जवळ त्यानी स्वतःचा हातानी दगडांनी ठेचुन बाळाची नाळ तोडली बाळा ला जवळचा नदीत घेऊन जाऊन स्वतः आणि बाळाला चक्क गार पाण्याने अंघोळ घातली अस म्हणतात की बाळंत बाई नि गार पाण्यात हात घालू नये पण परिस्थिती च अशी आली की जन्म दिलेल्या आई नि ही तोंड फिरवलं त्या वेळी कोणाचा सहारा नव्हता पायाखाली जमीन आणि वरती पांघरयला आभाळ आणि हातात 10 दिवसच बाळ पोटाला अन्न नाही अशी अवस्था.
माई त्यांचा स्मशानातील किस्सा सांगताना म्हणतात की स्मशानातील भाकरीने मला आयुष्याचा अर्थ सांगीतला कारण जेथे रात्री मानस जायला घाबरतात तिथे माणसांपासून वाचण्यासाठी माई रात्री स्मशानात राहत आणि भूक लागली तर प्रेताला जे पिट ठेवलं जायचं त्याची भाकरी करून त्या प्रेताचा चितेवर भाजून खाली आहे काय हा प्रसंग आणि काय परिस्थिती? म्हणूनच आज माई 1064 मुलाची आई आहे . एवढं होऊन ही त्या कोणाला दोष देत नाहीत तर म्हणतात की “परिस्थिती आली म्हणून सिंधू घडली” आसवांची चव खारट असते पण ती गोड माई ना वाटते.
“अरे रडता रडता डोळे भरले भरले,
असू सरले सरले आता हुंडके उरले,
आता हुंदके उरले नाही जीवाले विसावा,
अरे असावा बिगर रडू नको माझ्या जिवा,
रडू नको माझ्या जिवा तुला रड्या ची रे सव,
असावं हासवं हासवं त्यात संसाराची चव.