‘सा रे ग म प – लिटिल चॅम्प्स’ विजेती गायिका कार्तिकी गायकवाडचा 26 जुलैला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे नवरदेव!

.

लग्न ! म्हणजे दोन जीवांच्या मिलनाची गाठ. आयुष्याचं एका संसारातुन दुसऱ्या संसारात होणारं रूपांतर. अनोळखी व्यक्तीला ओळखीचा करून आपल्या आयुष्यात त्याला सर्वाच्च स्थान देणं. लग्नाच्या अश्या कितीतरी व्याख्या करता येतील.

देवा ब्राम्हणाच्या साक्षीने योग्य मुहूर्तावर आज कितीतरी माणसं लग्न बंधनात अडकत आहेत. लॉकडाउन मुळे अनेकांचे साखरपुडा किंवा ठरलेली लग्न लॉक झाल्यासारखीच झाली होती. पण नंतर सरकारने केलेल्या नियमाने लग्न सराई पुन्हा सुरू झाली.

अडकलेल्या अनेकांची लग्न समारंभ पूर्ण झाले. यामध्ये सर्वसामान्य ते श्रीमंत अश्या सगळ्या वर्गीकरण असलेल्या टप्प्यावरच्या लोकांचा समावेश आहे. प्रामुख्याने या सध्याच्या काळात कला क्षेत्रातील अनेक दिगगजांचे लग्न जमली. काहींची झाली तर काही मुहूर्तावर आहेत.

null

तुम्हाला कार्तिकी गायकवाड माहितेय का ? नसायला काय झालं. काही वर्षांपूर्वी जिच्या आवाजाची जादू साऱ्या महाराष्ट्र भर झाली होती. जिनं खूप कमी वयात करियर एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं होतं. दहा बारा वर्षांपूर्वी झी ने गाण्याचा एक कार्यक्रम केला होता.

झी सारे गम प लिटिल च्याम्प हे त्या शो चं नाव. कल्याणजी गायकवाड यांची मुलगी कार्तिकी गायकवाड हिनं सहभाग घेतला होता. हळूहळू एक एक टप्पा पार करत ती फायनल ला येऊन पोचली. तिच्या सुरेल आवाज फायनल मध्ये खूप गाजला आणि ती त्या शो ची विनर झाली. आज ती खूप मोठी झालेली आहे.

null

म्हणजेच सध्या ती लग्नाच्या वयात आयुष्य जगत आहे. तिच्या सोशल मीडियावरच्या अपडेट नुसार तिच्या घरी म्हणजे आळंदीत तिला पाहायला पाहुणे आले होते. चहा पोह्याच्या कार्यक्रमात सुद्धा कार्तिकी ने बाजी मारली आणि लग्न जमवलं असेच आपल्याला म्हणावं लागेल.

रोनीत पिसे याच्यासोबत तिचं लग्न ठरलं आहे. रोनीत हा पुण्यात राहतो. म्याक्यानिकल इंजिनिअरिंग करून त्यानं स्वतःचा मोठा उद्योग पुण्यात सुरू केलेला आहे. त्या दोघांची जोडी असलेले फोटो सध्या चर्चेत आहेत.

कार्तिकीनं आत्तापर्यंत खुप काम केलं आहे. लोकगीत हा तिच्या खूप आवडीचा प्रकार आहे. तिचे अनेक गायलेली गाणी खूप व्हायरल झालेली आहेत. या सगळ्या प्रवासात बाळकडू ज्यांच्याकडुन मिळालं त्या वडिलांचा खूप मोलाची साथ तिला मिळालेली आहे. २६ जुलै ला तिचा साखरपुडा आहे. कार्तिकी गायकवाड ला तिच्या नव्या इनींग साठी खूप साऱ्या शुभेच्छा !…

Leave a Comment