पद्मश्री पुरस्कार प्राप्त बॉलीवूड सिंगरच्या मुलाने वडिलांवरच केला गंभीर आरोप, म्हणाला, “सहा महिन्यांच्या प्रेग्नंट पत्नीला…”
१९९० च्या दशकात चित्रपट संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा स्टार गायक कुमार सानूचा मुलगा जान सानू चे नाव सध्या ‘बिग बॉस’ सिझन १४ मुळे खूप चर्चेत आहे. २०२० साली जान सानू बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. शोच्या आणि पहिल्याच आठवड्यात त्याने स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा गौ’प्य’स्फो’ट केला.
जान म्हणाला की, ‘माझी आई हीच माझ्यासाठी सर्व काही आहे. माझे वडीलही ती आणि माझी आई सुद्धा तीच’. शोच्या एका भागात जास्मिन, सारा गुरवाल आणि अन्य स्पर्धकांसोबत बोलताना जान त्याच्या आईबद्दल खूप भरभरून बोलला. तो म्हणाला की, ‘माझ्या आईने एकटीने माझा सांभाळ केला.
आई आणि वडील दोघांचीही भूमिका तिने एकटीने निभावली, माझी आई सहा महिन्यांची प्रेग्नंट असताना माझे पापा तिला सोडून गेलेत. नंतर दोघांचा घटस्फो’ट झाला. माझ्या आईने एकटीने मला लहानाचे मोठे केले. माझ्या संगोपनात माझ्या वडीलांची कुठलीही भूमिका नव्हती मी बिग बॉसमध्ये येताना घरी माझ्या आईची काळजी कोण घेईल, याचीच चिं’ता मला सतत होती’
जान हा सुप्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा आहे. जानची आई रिता ही कुमार सानूची पहिली पत्नी. त्यांचाच जान हा मुलगा. आज जान हा २६ वर्षांचा आहे. तो त्याच्या नावापुढे कुमार सानू असे वडिलांचे नाव लावतो. जान कुमार सानूदेखील वडिलांप्रमाणे एक चांगला सिंगर आहे. तारें जमीं पर या चित्रपटातील ब’म ब’म बोले हे गाणे जानने गायले आहे़. याशिवाय काही बंगाली सिनेमासाठीही त्याने गाणी गायली आहेत.
गायक कुमार सानू यांनी दोनदा लग्न झालेले आहे. रीता हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते. कुमार सानू व रिता यांचे पाहिले अपत्य म्हणजे मुलगा जैसी, जन्म १९८८ साली त्यानंतर या दोघांना जीको व जान अशी आणखी दोन मुले झाली.
पुढे १९९४ साली रिता व कुमार सानू यांचा घटस्फो’ट झाला. तिन्ही मुलांची क’स्ट’डी आई म्हणून रिताला मिळाली. स्टार व पद्मश्री कुमार सानूची मुले असूनही ही तिन्ही मुले मीडियाच्या लाईमलाईटपासून दूरच असतात.
१९९४ सालीच घ’ट’स्फो’टानंतर लगेचच कुमार सानू यांनी सलोनी भट्टाचार्यसोबत दुसरे लग्न केले. यांना 3 मुले आहेत. शॅनन, ऍना या दोन मुली आणि नाल कुमार जानू हा मुलगा. शॅननला कुमार सानू यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.