सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिच्या घरी लवकर घुमणार लहान बाळाचे स्वर, चाहत्यांना दिली तिने गोड बातमी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“ङोहाळे पुरवा गं हिचे ङोहाळे पुरवा, पाळण्यात पाहुणा येणार हो नवा…” या गाण्यावरून तुम्हांला समजलेच असेल की गोड बातमी आहे बुवा. अगदी बरोबर ओळखलंत, आपली सुमधुर स्वरांची प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र ही लवकरच ‘आ’ई’ होणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर तिने आपल्या पतीसोबतचे फोटोज् शेयर केले आहेत.

Savaniee Ravindra Engagement

आपली प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिने आपल्या सोशल मीडियावर एक गोड बातमी चाहत्यांना शेयर केली आहे. लवकरच तिच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. या आनंदाच्या वातावरणात सावनीने आपल्या लाडक्या पतीसोबत फोटोशूट केले आहे. आपल्या बेबी बंपसह सुंदर पोज देत तिने फोटोज् शेयर केले आहेत.

See also  'पाहिले न मी तुला' मालिकेतील मानसी नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल...

2018 मध्ये सावनी रवींद्र हिने ङॉक्टर आशिष धांडे यांसोबत लग्न केले. तर आता हे क्यूट कपल “आईबाबा” होण्याचा आनंद साजरा करत आहेत. आपल्या घरी येणाऱ्या छोट्याशा गोंडस पाहुण्याच्या स्वागताची तयारी करायला त्यांनी सुरूवात देखील केली.

maharashtra times

सुरांची सम्राज्ञीनी सावनी रवींद्र हिने आजपर्यंत आपल्या गोड आवाजात अनेक सुंदर गाणी गायली आहेत. तसेच तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या सावनी ला काही दिवसांपूर्वीच “राष्ट्रीय पुरस्कार” सुद्धा मिळाला होता. गुरू पंडीत हृदयनाथ मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याकडून सावनीने गायनाचे धडे गिरवले आहेत.

सावनी रवींद्र हिने सोशल मीडियावर शेयर केलेल्या गोड बातमीने तिचे सर्व चाहते सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. तसेच इतर सेलिब्रिटीज सुद्धा तिला भरघोस शुभेच्छा देत आहेत. तर सावनी व आशिष हे गोड कपल आपल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्टार मराठी परिवारातर्फे गोड गळयाची सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिचे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन.

See also  CID फेम एसीपी प्रद्युमनचा मुलगा आणि सून आहेत प्रसिद्ध मराठी कलाकार, त्यांची नावे जाणून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment