आजची माता आहे माता स्कंदमाता, जाणून घ्या माता स्कंदमाता कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

देवी स्कंदमाता : दुर्गामाताचे पाचवे रूप स्कंदमातेचे आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता म्हणजे भगवान श्री कार्तिकेयाची माता. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे स्वरूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक तर माता साक्षात करुणेची मूर्ती. स्कंद म्हणजे तज्ज्ञ, निष्णात. मातेच्या या रूपाची आराधना केल्याने साधकामध्ये कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.

यावेळी विशुद्ध चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. या दरम्यान साधकाने पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे. स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्युलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो.

स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री माता असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते, असे मानतात. भक्ताने एकाग्र मनाने तिला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही, अशी शास्त्र मान्यता आहे.

See also  या हॉस्पिटलमध्ये झाला नवरात्रीचा चमत्कार, घटस्थापनेच्या दिवशी घडला हा चमत्कार, जाणून घ्या संपूर्ण बातमी...

देवी स्कंदमातेची कथा : भगवान स्कंद लहानपणी या मातेच्या कडेवर बसले होते. त्यामुळे भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावाने देखील ही माता ओळखली जाते. ते देवासुर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णिला केला आहे. भगवान स्कंदाची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला ‘स्कंदमाता’ म्हणून ओळखले जाऊ लागले. स्कंदमाता चार भुजाधारी आहे.

तिच्या उजव्या बाजूकडील खालील हात वर उचललेला आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वर मुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचलली आहे. त्यामध्ये कमळाचे फूल आहे. या मातेचा रंग पूर्णत शुभ्र आहे. ही माता कमळाच्या आसनावर विराजमान असल्याने तिला पद्मासना असेही म्हटले जाते. ती शौर्याचे प्रतीक मानली जात असल्याने तिचे वाहन सिंह आहे.

See also  नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका ही 'चार' कामे, नाहीतर मोजावी लागेल खूप मोठी किंमत...

नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रांत विशेष महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे हिची पूजा अतिशय शुद्ध भावना ठेवून करायला पाहिजे. नवरात्रीच्या दिवसात या दिवशी अलसी म्हणजेच जवस हे औषधाच्या रूपात वाहून हिची पूजा करतात. जवस वात, कफ, पित्त यावर उपचार आहे. त्यामुळे हे तिला या दिवशी वाहतात. स्कंदमातेच्या उपासनेमुळे मनाला शांती प्राप्त होते.

देवी स्कंदमाता पूजन विधी : चौरंगावर कलश भरून तो स्थापित करून घ्यावा आणि त्यावर देवीचा फोटो ठेवा. त्यासोबत गणपती, नवग्रह यांच्या मूर्ती असल्यास त्यांची स्थापना करावी. नंतर संकल्प सोडून, आचमन करून देवीला स्नान घालून हळद-कुंकू, अत्तर, आभूषण, फूल, धूप, दीप दाखवावं. त्यानंतर ‘या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नम:॥’ या मंत्राचा जप करावा. तदनंतर खालील स्तोत्र पठन करावे,

देवी स्कंदमाता स्तोत्र :

नमामि स्कन्दमाता स्कन्दधारिणीम्।
समग्रतत्वसागरमपारपार गहराम्
शिवाप्रभा समुज्वलां स्फुच्छशागशेखराम्।
ललाटरत्नभास्करां जगत्प्रीन्तिभास्कराम्
महेन्द्रकश्यपार्चिता सनंतकुमाररसस्तुताम्।
सुरासुरेन्द्रवन्दिता यथार्थनिर्मलादभुताम्
अतक्र्यरोचिरूविजां विकार दोषवर्जतिाम्।
मुमुक्षुभिर्वििचन्तता विशेषतत्वमुचिताम्
नानालंकार भूषितां मृगेन्द्रवाहनाग्रजाम्।
सुशुध्दतत्वतोषणां त्रिवेन्दमारभुषताम्
सुधार्मिकौपकारिणी सुरेन्द्रकौरिघातिनीम्।
शुभां पुष्पमालिनी सुकर्णकल्पशाखिनीम्
तमोन्धकारयामिनी शिवस्वभाव कामिनीम्।
सहस्रसूर्यराजिका धनज्ज्योगकारिकाम्
सुशुद्ध काल कन्दला सुभडवृन्दमजुल्लाम्।
प्रजायिनी प्रजावति नमामि मातरं सतीम्
स्वकर्मकारिणी गति हरिप्रयाच पार्वतीम्।
अनन्तशक्ति कान्तिदां यशोअर्थभुक्तिमुक्तिदाम्
पुनपुनर्जगद्वितां नमाम्यहं सुरार्चिताम्।
जयेश्वरि त्रिलोचने प्रसीद मातापाहिमाम्।

माता स्कंदमाता पूजन महत्व : नवरात्रीच्या पंचमीला स्कंदमाता पूजन ही विशेष फलदायी आहे. तिच्या पूजेमुळे सर्व साधकांना, परिपूर्ण शांतता मिळते. आनंदाचा अनुभव मिळतो. मोक्ष प्राप्त होतो. सूर्यमंडलामुळे देवीचा उपासक तेजस्वी होतो. साधकाला कठोर तपस्ये शिवाय फलप्राप्ती होऊन शक्ती, परिपूर्ण शांतता आणि आनंदाचा अनुभव येतो.

See also  आजची माता आहे कालरात्री माता, जाणून घ्या माता कालरात्रीची कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Leave a Comment