भांडी घासणे, वेटर, अभिनेत्री पासून खासदार ते थेट केंद्रीय मंत्री, वाचा स्मृती इराणी यांचा आजवरचा प्रवास…
मित्रांनो!, अभिनेत्री ते खासदार आणि केंद्रीय मंत्री इथपर्यंतचा स्मृती इराणी यांचा प्रवास अतिशय खडतर आहे. होय!, स्मृती इराणी यांनी वेटर म्हणून देखील केले आहे काम, वाचा त्यांचा आजवरचा प्रवास.
स्मृती इराणी यांनी त्यांच्या करियरच्या सुरुवातीला आतिश, कविता, हम हैं कल आज और कल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही क्योंकी साँस भी भी बहू थी या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसी ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डो’क्या’व’र घेतली होती.
क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका संपून आज अनेक वर्षं झाली असले तरी या मालिकेतील तुलसी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या भूमिकेसाठी स्मृती यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.
अभिनेत्री ते खासदार आणि केंद्रीय मंत्री इथपर्यंतचा स्मृती इराणी यांचा प्रवास अतिशय खडतर आहे. त्या सध्या वस्रोद्योग व बाल कल्याण मंत्रालयाच्या मंत्री आहेत. स्मृती यांचा जन्म २३ मार्च १९७६ ला दिल्लीत झाला. त्यांनी दिल्लीतच त्यांचे शिक्षण घेतले. १९९८ मध्ये त्यांनी मिस इंडिया पेजेंट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
त्यानंतर सुप्रसिद्ध पंजाबी गायक मिका सिंगच्या सावन में लग गई आग या प्रसिद्ध गाण्यात त्या झ’ळ’क’ल्या. त्यांनी मॅकडॉनल्डमध्ये देखील काम केले आहे. “तिथे मी भांडीदेखील घासली आहेत”, असे त्यांनी विविध प्रथितयश माध्यमांना दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहेच.
क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे स्मृती यांचे आयुष्यच बदलले. त्यानंतर त्या बहुरानीयाँ, एक थी नायिका, विरुद्ध यांसारख्या मालिकांमध्ये झळकल्या. विरुद्ध या मालिकेची निर्मिती देखील त्यांनीच केली होती. तसेच रामायण या मालिकेत त्यांनी सीतेची भूमिका साकारली होती.
स्मृती इराणी यांचे झुबिन इराणी यांच्यासोबत लग्न झाले असून झुबिन यांचे हे दुसरे लग्न आहे. स्मृती यांनी 2003 मध्ये अभिनयक्षेत्राला रामराम करत राजकारणात प्रवेश केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
मोदींजींच्या मंत्रिमंडळात, स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आल्यानंतर त्यांच्यावर टी’का होऊ लागली. देशाच्या शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण किती, यावरुन निर्माण झालेला वा’द चि’घ’ळ’ला होता. स्मृती इराणी या पदवीधरही नसताना त्यांच्याकडे शिक्षण विषयक धोरण ठरवणारे मंत्रालय कसे सोपवण्यात आले, असा असा प्रश्न विचारण्यात येत होता. खुद्द भाजपातही स्मृती यांना दिलेल्या जबाबदारीवरून ना’रा’जी पसरली होती. शेवटी स्मृती इराणी यावर प्रतिक्रिया देतांना म्हणाल्या होत्या की. “माझे काम पाहून मगच माझे मूल्यमापन करा.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.