आपल्या जन्मदात्यांसाठी अभिनेता भरत जाधवने केले असे काही, जे ऐकून तुमच्या देखील डोळयांत पाणी येईल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेसृष्टीत अनेक विनोदवीर कलाकार आहेत. त्यापैकी अभिनेता भरत जाधव हे एक सुप्रसिद्ध नाव आहे. चित्रपट, मालिका, नाटक अशा विविध माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक उत्कृष्ट अभिनेता होण्याबरोबरच तो एक आदर्श, गुणी मुलगा सुद्धा आहे. आतापर्यंत आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या, अतोनात मेहनत घेणाऱ्या भरत जाधवने एक अत्यंत कौतुकास्पद काम केल्याचे समोर आले आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांच्या मराठी तारका या फेसबुक पेजवर त्यांनी एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये भरत जाधवने आपल्या कोल्हापूरात असलेल्या शेतामध्ये आई- वङिलांचे स्मारक उभारले आहे. त्यामुळे “पुत्र असावा तर असा” अशा स्वरूपात कॅप्शन देत टिळेकर यांच्या फेसबुक स्मारकावर हा फोटो शेयर करण्यात आला आहे. त्याचसोबत त्याच्या आईवडिलांचा सुद्धा फोटो शेयर करण्यात आला आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा पती अभिनय नाही तर करतो हे काम, ऐकून तुम्हालाही विश्वासच बसणार नाही…

जन्मदात्या आईवडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी भरत जाधवने खूप कष्ट घेतले आहेत. टॅक्सी ङ्रायव्हर म्हणून आपल्या वडिलांनी एवढी वर्षे प्रवाशांची सेवा केली. त्यामुळे आईवडिलांची सेवा करायची संधी मिळावी, म्हणून भरत जाधवने खास गाडी खरेदी केली. इतकंच नव्हे तर त्याने नवीन घर बांधल्यावर आपल्या आईवडिलांना विमानात बसून घरी नेले होते.

अभिनेता भरत जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने जत्रा, वन रूम किचन, पछाडलेला, खबरदार, बकुळा नामदेव घोटाळे, हसा चकटफू, सही रे सही अशा अनेक नाटकांत व चित्रपटांत काम केले आहे. ऑल द बेस्ट या नाटकाच्या अप्रतिम यशानंतर भरत जाधव च्या करियरला नवीन वळण मिळाले.

See also  या कारणामुळे कीर्तनकार शिवलीला पाटीलने घेतला बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment