“माझ्यानंतर त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या, हे मला माहीत नाही” या अभिनेत्रीने सलमान खान बद्दल केला मोठा खुलासा…
बॉलीवुड इंडस्ट्रीचा किंग अभिनेता सलमान खान याचे संपूर्ण जगभरात करोडोंच्या संख्येने फॅन्स आहेत. कित्येक अभिनेत्रींसोबत आतापर्यंत सलमान खान रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. परंतु तरीदेखील अजूनही त्याचे लग्न मात्र झालेले नाही. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोमी अली हे रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा देखील होत होत्या. इतकंच नव्हे तर सोमी सुद्धा सलमान खान सोबत बॉलीवुड मध्ये पदार्पण करणार होती.
आपल्या एका मुलाखतीमध्ये सोमी अली हिने सर्व जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी तिने आपल्या व सलमानच्या नात्याविषयी सुद्धा सांगितले आहे. सलमान खानवर सोमीने फ’सवणूक केल्याचा आ’रो’प केला होता. तर मुलाखतीमध्ये ती स्वतःच त्यांच्या रिलेशनशिप विषयी बोलत होती.
“सलमान ने त्याचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते.चित्रपटात त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेसाठी तो अभिनेत्री शोधत होता. त्यासाठी माझी निवड करण्यात आली होती. या चित्रपटाचे नाव बुलंद असे होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही काठमांडूला गेलो होतो. परंतु नंतर शूटिंग थांबले, असे सोमीने सांगितले.
सलमान खानशी तुझा संपर्क आहे का, असा प्रश्न विचारला असता, सोमी म्हणाली की,”मागील पाच वर्षांत माझे सलमान सोबत काहीच बोलणे झाले नाही. त्यामुळे मला असे वाटते की आपण आपल्या आयुष्यात पुढे जाणे, खूप गरजेचे आहे. 1999 मध्ये आम्ही विभक्त झालो, त्यानंतर त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या हे मला माहीत नाही.
पण तरीही मी त्याला पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते. कारण मला माहित आहे की, सलमान ची स्वयंसेवी संस्था ही खूप उत्कृष्ट काम करत आहे. त्याच्या “Being Human” या संस्थेचा मला अतिशय अभिमान आहे.”
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पुन्हा कमबॅक करण्याविषयी ती म्हणाली की,”तिला जर चांगली भूमिका मिळाली तर ती पुन्हा अभिनय क्षेत्रात नक्कीच येईल. सध्यातरी सोमीने स्वतःला चित्रपट सृष्टीपासून दूर ठेवले आहे आणि ती आता समाजसेवा करते. आता ज्या घरातील स्त्रियांवर अन्याय होतो, त्यांना सोमी मदत करते. “नो मोर टियर्स” असे तिच्या स्वयंसेवी संस्थेचे नाव आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.