प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने खरेदी केले खूपच महागडे आलिशान घर, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!
२०२० हे साल अर्थातच सर्वांवर भारी पडलं, मुळात सिनेसृष्टीलाही याचा प्रचंड फ’ट’का बसल्याच चित्रही पहायला मिळालं. पण आता 2021 ची सुरूवातच अशी काही भन्नाट होताना पहायला मिळते आहे की, सर्वकाही जणू क्षणार्धात पुर्वरत रूळावर येऊन ठेपलं आहे.
2021 मधे मराठी सिनेसृष्टीत लग्नाची लगबग सुरू झाली, काहींच्या चित्रपटांची अनाउन्समेंट, तर काहींच्या इतर चांगल्या बाबींची पूर्तता होताना पहायला मिळते आहे. अशीच काहीशी मोठी बाब आता हिंदी सिनेमातील दबंग गर्ल सोनाक्षीच्या बाबतीत घडताना पहायला मिळते आहे.
काही दिवसांपूर्वी हिंदी सिनेसृष्टीतल्या आलियापासून ते जान्हवी कपूर यांनी नव्या घराची खरेदी केल्याच्या चर्चा रंगत असतानाच आता सोनीक्षी सिन्हा हिनेदेखील मुंबईत स्वत:च घर घेतल्याची बातमी ऐकायला मिळाली आहे.
मुंबईतल्या वांद्रे या भागात सोनाक्षीने चक्क 4 बीएचके अपार्टमेंट खरेदी केलं असल्याची खबर पिंकव्हिलाने दिली. विशेष बाब म्हणजे, घर घेतल्याच्या मुहूर्तावर नव्या वर्षात माझं स्वप्न पूर्ण झालं असंही सोनाक्षीने आवर्जून म्हटले आहे. वांद्रातील रिक्लॅमेशन या भागात सोनाक्षीने तिचं नवं घर घेतल आहे.
सोनाक्षी सिन्हाने पुढे हेही सांगितल की, जेव्हापासून तिने कामाची सुरूवात केली होती तेव्हापासून तिने स्वत:च्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहिलं होतं. आपण स्वत:साठी निवडलेल्या एका ठराविक अटींप्रमाणे वय वर्षे 30 होईपर्यंत तरी निदान मला ते पूर्ण करायचं होतं, असंही सोनाक्षी म्हणाली.
सोनाक्षी म्हणते, घर घेण्यासाठी मला फक्त माझ्या कामातून मिळालेलाच पैसा वापरायचा होता आणि त्यासाठी मी इतके दिवस थांबले होते, अखेर माझ्या कष्टाचं चीज झालं याचा मला आनंद आहे. सोनाक्षीने पुढे याचाही खुलासा केला की, स्वत:च घर जरी तिने खरेदी केल असलं तरी ती पुढेही आपल्या आईवडीलांसोबतच राहणार असल्याचीही माहिती तिने दिली.
सोनाक्षी म्हणाली, एकप्रकारे हे घर माझ्यासाठी माझी भविष्यातली गुंतवणूक आहे, असं मी मानते. दबंग गर्ल सोनाक्षीच्या आजवर आलेल्या चित्रपटांनी चांगलीच क्रेझ प्रेक्षकांवर निर्माण करून ठेवली.
आता आणखी उत्सुकतेची बात म्हणजे तिच्या नव्या येणाऱ्या “भुज- द प्राईड ऑफ इंडिया” या चित्रपटाची सर्वांना आतुरता लागून राहिली आहे. ह्या चित्रपटात अजय देवगण लीड भुमिका निभावत असलेला पहायला मिळणार आहे. सोनाक्षीने बरेच दिवस इतर दुसरा प्रोजेक्ट केला नाही, त्यामुळे कदाचित या प्रोजेक्टकडून तिच्यासोबतच तिच्या चाहत्यांनाही तिच्याकडून चांगल्या आशा आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!