“शाळेत असतानाच होते माझे एका मुलासोबत अफेयर होते” स्वतः सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘अ’फे’य’र’ बॉलीवुड इंडस्ट्रीसाठी काही नवीन गोष्ट नाही. येथील प्रत्येक सेलिब्रिटीचे कुणासोबत का होईना….परंतु अफेयर आहेच. सिंगल असा एकही सेलिब्रिटी आपल्याला येथे शोधून देखील सापडणार नाही. आज आम्ही तुम्हांला बॉलीवुडची मोस्ट ब्युटीफूल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्याविषयी तुम्हांला माहीत नसलेले सिक्रेट सांगणार आहोत. बॉलीवुडच्या या चंदेरी दुनियेत सोनाक्षी सिन्हा ने स्वतःची अशी एक वेगळीच ओळख बनवली आहे.

प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची सोनाक्षी लाडकी लेक आहे. तर तिच्या आईचे नाव पूनम सिन्हा आहे. आपल्या मुलाखतीच्या दरम्यान सोनाक्षी सिन्हा ने स्वतःच्या अफेयर विषयी खुलेआम सांगितले होते. तिने म्हटले की, जेव्हा ती शाळेत होती, तेव्हाच ती एका मुलासोबत रिलेशनशिप मध्ये होती. परंतु ते रिलेशनशिप जास्त दिवस टिकू शकले नाही. त्या दिवसांत सोनाक्षी रिलेशनशिप साठी काही खास सिरीयस नव्हती.

See also  नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर करून मोकळ्या केल्या भावना, म्हणाली, "माझा नवरा......"

त्यानंतर ती 20- 21 वर्षांची असताना एका मुलासोबत रिलेशनशिप मध्ये राहिली. तिचे हे रिलेशनशिप साधारणतः पाच वर्षे टिकले. तेव्हा सोनाक्षी या मुलासोबत खूप सिरीयस होती. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीमत्व हे वेगळे असते. त्यामुळे आपल्याला अशी व्यक्ती शोधायला हवी, जी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेन आणि समजून घेईल. जेव्हा तुम्हांला राग येईल, तेव्हा तो राग सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी. मी त्याच्याकडून खूप काही शिकले. परंतु त्याने शेवटी ब्रेकअप केले. कारण काही गोष्टी ह्या आपण जसे मोठे होत जातो, त्याप्रमाणे शिकत जातो.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या आई- वङिलांविषयी म्हणताना सांगते की, माझे वडील माझ्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधू शकतील की नाही, माहीत नाही. त्यामुळे हे काम मलाच करावे लागेल. आई माझ्यासमोर लग्नाचे विषय काढते. परंतु मी तिला सरळ म्हणते की, मला जेव्हा लग्न करायचे असेल, तेव्हा मी करील.

See also  सानिया मिर्झा पती शोएब मलिकसमोर म्हणाली 'या बॉलीवूड अभिनेत्या सोबत करायचे आहे लग्न', जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये “दबंग” या चित्रपटातून ङेब्यू केला होता. परंतु तिने एक कॉस्ट्यूम ङायरेक्टर म्हणून आपल्या करियरची सुरुवात इंङस्टीमध्ये केली होती. 2005 मधील “मेरा दिल ले कर देखो” या चित्रपटातील कॉस्ट्यूम ङिजाइन तिने केले होते. त्यानंतर अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय करून तिने स्वतःची अफलातुन ओळख बनवली.

सोनाक्षी सिन्हा ने दबंग 2, रावङी राठोङ, बुलेट राजा, तेवर, हॉलिडे, अकिरा, खानदानी शफाखाना, कलंक, दबंग 3, मिशन मंगल यांसारखे चित्रपट केले आहेत. हल्लीच तिचा “भुज द प्राइङ ऑफ इंडिया” हा चित्रपट रिलीज झाला आहे. तर लवकरच तिचा “काकूङा” हा सिनेमा सुद्धा प्रदर्शित होणार आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे नाव सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खान याच्या मेहुण्यासोबत जोडले जात आहे.

See also  अरे देवा ! या अभिनेत्रीने चक्क कॅमेरा चालू करुन सगळ्यांसमोर केली अंघोळ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment