अभिनेत्री नव्हे तर या क्षेत्रात करियर करायचं होतं मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला, ऐका तिची स्ट्रगल स्टोरी…

मराठी सिनेसृष्टीत ‘अ’प्स’रा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. सोनाली कुलकर्णी हिचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील लष्करी छावणी मध्ये झाला होता. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातील निवृत्त ङॉक्टर होते. त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात तब्बल 30 वर्षे काम केले. तिची आई सविंदर ही पंजाबी असल्याने तिच्या बोलण्यातून ही भाषा जाणवते.

71821136

सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले. तर तिचे माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून ‘प’त्र’का’रि’ता’ विषयातील पदवी तिने मिळवली आहे. तसेच पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पदव्युत्तर शिक्षण देखील घेतले आहे.

मागील वर्षीच सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोङेकर यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. सोशल मीडियावरील आपल्या मनमोहक फोटोज् मुळे सोनाली नेहमी चाहत्यांच्या हृदयावर वार करते. आपले नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओज ती शेयर करते.

See also  या फोटोतल्या चिमुरडीला ओळखलं का ? इंडियन आयडॉल या रियालिटी शो मधून ती पोहचली जगभरात...

81626307

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या “बकुळा नामदेव घोटाळे” या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परंतु दिग्दर्शक रवी जाधव यांच्या “नटरंग” या चित्रपटातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला खरी ओळख मिळाली. या चित्रपटात तिने केलेले लावणी नृत्य त्यामुळे ती जगभरात ‘अ’प्स’रा’ म्हणून नावारूपास आली.

नटरंग चित्रपटातील “अप्सरा आली” या गाण्यातून तिचे नखशिखांत सौंदर्य आणि अप्रतिम लावणी नृत्य पाहून संपूर्ण महाराष्ट्राला तिने वेडेपिसे केले. त्यानंतर तिने क्षणभर विश्रांती, झपाटलेला 2, अजिंठा असे अनेक चित्रपट केले.

इतकंच नव्हे तर आपल्या सोनाली कुलकर्णीने मराठी सोबतच हिंदी चित्रपटांत देखील काम केले आहे. “ग्रँड मस्ती” या चित्रपटातून तिने बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. यामध्ये तिने रितेश देशमुखची पत्नी ममता हिची भूमिका साकारली होती.

See also  ‘देवमाणूस’ फेम सोनाली पाटील दिसणार मराठी बिगबॉसमध्ये? हे कलाकार दिसू शकतात बिग बॉस मराठी 3 ऱ्या पर्वात...

71821137

आबा झिंदाबाद, गाढवाचं लग्न, हाय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, गोष्ट लग्नाची, इरादा पक्का, रमा माधव, मितवा, क्लासमेट्स यांसारख्या अनेक चित्रपटांत ती झळकली होती. त्याशिवाय पोस्टर गर्ल, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, विकी वेलिंगकर, बघतोस काय मुजरा कर यांसारख्या अनेक चित्रपटांत तिने कमालीचे काम केले आहे.

तर लवकरच तिचा “झिम्मा” हा चित्रपट चाहत्यांना भेटीसाठी येत आहे. सध्या कोरोना वातावरणामुळे या चित्रपटाची रिलीज ङेट पुढे ढकलली आहे. त्याचप्रमाणे “छत्रपती ताराराणी” आणि “फ्रेश लाईम सोडा” हे दोन चित्रपट सुद्धा सोनालीने साइन केले आहेत. त्याचा फर्स्ट लुक तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केला होता. तर या नवीन आगामी चित्रपटांची सोनालीचे फॅन्स आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

See also  'या' इवल्याशा गोंडस परीला ओळखलंत का? आज आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close