सोनाली कुलकर्णी करणार या नव्या क्षेत्रात पदार्पण, लवकरच येतोय तिचा हा नवीन वेब सिनेमा…

सिनेसृष्टीतले कलाकार हे नेहमी अभिनय करत असताना काहीतरी दुसरा ही मार्ग शोधतात. कारण ज्यामुळे त्यांना आयुष्य जरा सुखात घालता येत. बिझनेस होत राहतो आणि पैश्याची आवक जावक चालू राहते. तर असे अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत की ज्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत.

आता मराठी मधील एका प्रसिद्ध अभिनेत्री ने एका इंडस्ट्रीत ल्याच नव्या क्षेत्रात पाऊल टाकायचं ठरवलेलं आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती नेमकं कोण ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

wp5028885

आपल्या अप्रतिम सौदर्यानं आणि नृत्यातील अदाकारीने प्रेक्षकांना घा’या’ळ कराणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

लवकरच सोनाली एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालीय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भाऊ अतुल कुलकर्णी याच्यासोबत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत एकत्र येत सोनाली कुलकर्णी ‘हाकामारी’ या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईकने लग्नाच्या महिनाभरातचं दिली गुड न्यूज, पहा काय आहे खुशखबर?

71163538

ज्यामुळे ती निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. अभिनेत्री म्हणून ती उत्तम आहेच आणि तिला कामेही खूप मिळतात; पण आता या क्षेत्रात उडी घेउन ती कशी स्वतःला सिद्ध करतेय हे पाहायला लागणार आहे.

‘हाकामारी’ हा एक सस्पेन्स सिनेमा असणार आहे. सस्पेन्स सिनेमांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. मात्र एखाद्या सिनेमाची कथा ही फक्त कल्पनेपुरती मर्यादित नसेल तर? मनोरंजन विश्वात असे अनेक सिनेमे आहेत जे केवळ काल्पनिक नसून सत्य घ’ट’नां’वर आधारित आहेत. ‘हाकामारी’ सिनेमा हा याच प्रकारचा आहे.

75802825

अभिनेत्री आणि सर्वांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि नृत्याने रसिकांना वेड लावत असते. नटरंग, अजिंठा, क्लासमेट्स,मितवा, हिरकणी,हंपीपर्यंत, सिंघम रिटर्न, ग्रेट ग्रँड मस्ती अशा अनेक मराठी, हिंदी सिनेमांमधून सोनालीने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा पती अभिनय नाही तर करतो हे काम, ऐकून विश्वासच बसणार नाही...

कारण वेगळेपणा नसेल तर मग काम करण्यात काय अर्थय असं तिचं नेहमीचं म्हणणं आहे. तर आता ती तिचं वेगळेपणा निर्मिती करून दाखवणार आहे.

Sonalee Kulkarni Films Awards

या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली भाऊ अतुल कुलकर्णीसोबत ‘द फॅलेरर्स’ या बॅनरच्या अंतर्गत निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. या नव्या भूमिकेबद्दल सांगताना सोनाली म्हणते, ” मी एक अभिनेत्री होण्याआधी एक निर्माताच होते. रेडिओ, टीव्ही आणि फिल्म प्रॉडक्शनची विद्यार्थिनी असताना मला निर्मिती क्षेत्राने भुरळ घातली. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटला वाव आहे. या सिनेमातून आम्ही एक वेगळा पठडीबाहेरील सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. समीर विध्वंस सारखा दूरदृष्टी असणारा दिग्दर्शक, प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर ही टीम एकत्र येत एक सुंदर कलाकृती रसिकांसाठी घेऊन येणार आहे.”

‘हाकामा’री’ हा प्लॅनेट मराठीचा पहिलाच वेब सिनेमा असणार आहे, या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक समीर वि’ध्वं’स करणार आहेत.लवस्टोरी सिनेमांमध्ये समीर यांचा हातखंडा आहे. तरीही या सिनेमाच्या निमित्ताने समीर पहिल्यांदाच एका भयपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची कथा साहित्य परिषदेचे पुरस्कार प्राप्त लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून त्यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी आदी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

See also  'देवमाणूस' मालिकेतील नाम्या माहीत आहे का? खऱ्या आयुष्यात आहे असा, आधी करायचा हे काम...

Sonalee Kulkarni

तर प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ” ‘हाकामारी’ हा अतिशय वेगळा सस्पेन्स सिनेमा असणार आहे. या सिनेमाची कथा लोककथा, गूढता, प्रेम आणि भयपट या सर्व विषयांना धरून पुढे जाणारी आहे.

सोनाली कुलकर्णी ने या बद्दल सोशल मीडियावर माहिती दिलेली आहे. आता तिच्या चाहत्यांना या नव्या चित्रपटाची सुद्धा उत्सुकता लागलेली आहे. तिचे लाखो करोडो चाहते महाराष्ट्र मध्ये आहेत. ती खूप लोकप्रिय आहे. तर तिला तिच्या पुढील भावी वाटचाली करीता शुभेच्छा !…स्टार मराठी कडुन.

Leave a Comment

close