“तुझ्यासारख्या सावळ्या मूली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाहीत” सोनाली कुलकर्णीला एका महिलेने असे म्हटले त्यानंतर जे झाले ते…
मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली सारख्या उत्कृष्ट अभिनेत्रीला देखील कधीकाळी आपल्या रंगामुळे काही गोष्टींचा सामना करावा लागला, हे ऐकून तर आपला विश्वासच बसणार नाही. परंतु चकमकीत दुनियेच्या या रोशनाईत करियरच्या सुरूवातीला सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या प्रसंगाना तोंड द्यावे लागते. अगदी त्याप्रमाणेच सोनाली कुलकर्णी हिला देखील अशा प्रसंगातून जावे लागले.
मराठी सिनेसृष्टी व बॉलीवुडने सोनालीला मोठ्या अभिमानाने स्वीकारले. परंतु काही लोकांनी तिच्या वर्णामुळे तिच्यावर आक्षेप घेतला. या लोकांनी तर तिला सुनावण्याची एक संधी सुद्धा अजिबात सोडली नाही. आपल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या आयुष्यातील या कङू आठवणींना उजाळा दिला आहे.
ती म्हणते की,”बॉलीवुडच्या मायानगरीत मला कधीच वर्णभेदाचा सामना करावा लागला नाही. परंतु पुण्यात मात्र मी अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. बॉलीवुडनं मला मनापासून स्वीकारलं आणि माझं मनसोक्त कौतुक केलं. परंतु पुण्यात जेव्हा मी पहिल्यांदाच ऑडिशनसाठी गेले होते. तेव्हा एका महिलेने मला अक्षरशः नको नको ते सुनावले होते.”
तेव्हा मी गिरीश कर्नाड यांना भेटायला गेले होते. त्यादरम्यान आणखी एक मूलगी तिच्या आईसोबत तिथे आली होती. त्या मूलीच्या आईने मला बघितले आणि विचारले की,”तू इथे का आलीस?” तिच्या या प्रश्नावर मी अगदी हळू आवाजात म्हटले की, गिरीश कर्नाड यांना भेटायला आली आहे.
त्या महिलेने मला असे का विचारले असावे, हे त्यावेळी मला काही समजलेच नाही. पण ती तेवढ्यावरच काही थांबली नाही. ती पुढे म्हणाली की,”तू कधी आरशात स्वतःचा चेहरा पाहिला आहेस का? सावळ्या मूली ह्या कॅमेर्यात चांगल्या दिसत नाहीत. असं ती महिला मला तिथे थेट म्हणाली.
त्या अनोळखी महिलेच्या अशा बोलण्याने मला थोडेसे वाईट तर वाटलेच. पण त्यानंतर थोड्या वेळातच गिरीश कर्नाड तेथे आले. त्यांनी माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या व तोंडभरून कौतुक देखील केले. गिरीश सरांच्या कौतुकास्पद बोलण्यानंतर ती महिला मला काय बोलली, हे काही महत्त्वाचे राहिले सुद्धा नाही. अर्थात मी एवढं गंभीरपणे घेतलं देखील नसतं.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने गिरीश कर्नाड दिग्दर्शित “चेलुवी” या कन्नड सिनेमातून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर तिने फक्त मराठीच नव्हे तर गुजराती, कन्नड, तामिळ, इटालियन आणि इंग्लिश या चित्रपटांत सुद्धा काम केले. आपल्या मराठी इंडस्ट्रीत कैरी, देवराई, मुक्ता, दोघी, सखी, अगं बाई अरेच्चा 2 हे तिचे चित्रपट हिट ठरले. तर बॉलीवुडच्या मायानगरीत दिल चाहता है, ङरना जरूरी है, दिल विल प्यार व्यार, प्यार तूने क्या किया व सिंघम यांसारख्या सुपरङुपरहिट चित्रपटांत तिने काम केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.