साखरपुड्याच्या पलीकडे गेलेली आणि आता लग्नाच्या उंबरठ्यावर आलेली, पहा सोनालीने शेअर केली लग्नाची खास गोष्ट!
सध्या मराठी सिनेसृष्टीत एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीच्या लग्नाच्या तारखेची. नुकतच सोनाली कुलकर्णी हिने आपल्या साखरपुड्याचे जुने फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
तिने अपलोड केलेल्या फोटोंना सोशल मीडियात चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे, सोबतच चाहत्यांकडून लाईक्स आणि जबरदस्त कमेंट्सचा प्रतिसाद देखील मिळतो आहे. साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे असं म्हणत सोनालीने हे फोटो शेअर केले.
तर अशी ही मराठमोळी अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून अनेक विषयांना धरून चर्चेत राहिली होती. कुणाल बेनोडेकर यासोबत दोन फेब्रुवारी 2020 रोजी सोनालीने आपला साखरपुडा केला होता. हा साखरपुडा दुबईतच पार पडल्याची खबर होती.
कुणाल बेडेकर कामानिमित्त दुबईला वास्तव्यास राहत असल्याने कदाचित सोनाली लग्नानंतर सिनेमांच्या शेड्युलमधे वेळ काढत दुबईला ये जा करणार, हे चित्र भविष्यात पहायला मिळू शकेल.
तिच्या साखरपुड्याला आता जवळपास एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे आणि अशात तिने आता फोटो शेअर करत त्यावर अगदीच मार्मिक कॅप्शन लिहीत आपल्या लग्नाची पूर्वसूचना चाहत्यांना व रसिक प्रेक्षकांना दिली आहे, असं म्हणता येईल.
पारंपारिक दागिने, कांजीवरम साडी आणि केसात माळलेला मोगर्याचा गजरा यामुळे साखरपुड्याच्या फोटोमध्ये सोनालीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. सोनालीला पारंपारिक लूक मधे पाहून तिचे चाहते मात्र अगदीच मं’त्र’मु’ग्ध होऊन गेले आहेत.
सोनालीच्या कुणाल बेनोडेकर सोबत लग्नाच्या तारखेची अजून तरी काही निश्चिती झाली नसली, तरीदेखील यावर्षी दोघांचा विवाह संपन्न होण्याची ही निश्चितच चिन्हे आहेत; असं म्हणता येईल. कांजीवरम साडीच्या पेहरावाला नाकात नथ, गळ्यात मोत्याची माळ, कानातले झुमके यांनी सोनालीच्या सौंदर्याला असा काही बहारदार साज चढवला होता की जणू साक्षात अप्सरेचं रूप आपण समोर पाहत आहोत, अशीच प्रतिक्रिया मनात यावेळी उमटत होती.
सोनालीच्या मितवा या सिनेमातल्या संवादाप्रमाणेच तिने हटके कॅप्शन देत सोनालीने हे फोटो शेअर केले. एका वर्षभरापूर्वीच्या या साऱ्या गोड आठवणी शेअर करताना हावरी नवरी असा मजेदार हॅशटॅगही तिने वापरला आहे.
परंतु आपण हावरी नाही आहोत, असंही ती पुढे म्हणाली. हा हॅशटॅग केवळ मजेसाठी होता असं ती म्हणते. सोनालीच्या या सर्व बाबी इंस्टाग्रामवर शेअर झाल्यानंतर असंच वाटतं की, या वर्षात कदाचित सर्व मराठी सिनेसृष्टीच लग्नबं’ध’ना’त अ’ड’क’णा’र आहे की काय?
कारण नुकतच सिद्धार्थ-मिताली, अभिज्ञा भावे, मानसी नाईक, प्राजक्ता परब, आशुतोष कुलकर्णी, ही मंडळीदेखील लग्नबं’ध’ना’त अ’ड’क’ली. बाकी इतर बाबी काही असल्या तरी आपण मात्र आता सोनाली आणि कुणाल बेनोडेकर
यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. आणि सोनाली तिच्या अभिनयातून अनेक वर्षे या सिनेसृष्टीत कार्य करत राहो, तिच्याकडून रसिकप्रेक्षकांच मनोरंजन करण्याच काम अधिकाधिक उत्तमरीत्या होवो, याच सदिच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!