नेहा कक्करची बहीण सोनू कक्करचा पती आहे ‘ही’ प्रसिद्ध व्यक्ती, खूपच रोमॅन्टिक आहे यांची लवस्टोरी…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध सिंगर नेहा कक्कर हिचे संपूर्ण जगभरात लाखो फॅन्स आहेत. नेहाची मोठी बहीण सोनू कक्कर हिला देखील आपण सर्वजण ओळखतो. परंतु तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी तुम्हांला ठाऊक आहे का? सोनू ही विवाहित आहे.
तिच्या लग्नाला तब्बल 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. नेहा कक्कर व तिचा पती रोहनप्रीत हे दोघेजण नेहमी लाइमलाइट मध्ये असतात. परंतु नेहाचे जिजु म्हणजेच सोनूचा पती हा मात्र लाइमलाइट पासून दूर राहणेच पसंद करतो.
सोनूच्या पतीचे नाव निरज शर्मा असे आहे. 20 ङिसेंबर 2006 मध्ये सोनू व निरज यांचे लग्न झाले. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, सोनूच्या कोणत्याही इव्हेंटला निरज कधीच दिसत नाही. सोनू कक्कर ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक पॉप्युलर सिंगर आहे. तसेच तिचा पती निरज हा क्रिएटिव्ह ङायरेक्टर व रियालिटी शो चा फाऊंङर आहे.
मागीलवर्षी वेलेंटाईन ङे ला निरजने आपली पत्नी सोनू हिला बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती. सोनूने आपले कार सोबतचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले होते. तर सोनू कक्कर ही सध्या “इंङियन आयङॉल 12” मध्ये जज म्हणून काम सांभाळत आहे. तर नेहा ही सध्या शो मधून पूर्णपणे गायब आहे.
अशी सुरू झाली होती त्यांची लवस्टोरी : सोनू कक्कर व निरज शर्मा यांची लवस्टोरी खूपच ढिंकचाक आहे. सोनूने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, आम्ही दोघेही पहिल्यांदा भेटलो होतो. ती भेट खूपच खास होती. तेव्हा आम्ही फक्त गप्पा मारल्या होत्या. एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला होता. अचानकपणे एक दिवस त्याचा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असा मेसेज आला होता. तेव्हा मेसेजवर काय बोलावे, हेच मला समजत नव्हते.
तेव्हा तू माझी मस्करी करतोस का? हा प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर मी खरे बोलत आहे. असे त्याने उत्तर दिले. कारण तो कधीच माझ्या प्रेमात पडला होता. नंतर हळूहळू मला पण तो खूप आवडायला लागला. त्यानंतर आम्ही आमच्या नात्याविषयी कुटुंबियांना सांगितले व आम्ही लग्न केले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.