“माझी गर्लफ्रेंड आयफोन मागत आहे, काही होईल का” एका व्यक्तीच्या या विनंतीवर सोनू सूदने दिले हे भन्नाट उत्तर…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता सोनू सूद हा नेहमीच समाजसेवा करण्यात अव्वल स्थानावर असतो. कोरोना काळात देखील त्याने पहिल्या लाटेपासूनच अनेक गरजू व्यक्तींना मदत केली आहे. मागील दिङ वर्षांपासून तो आपल्या परीने लोकांना जमेल तशी मदत करत आहे. त्यामुळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व गरजू लोक त्यांच्याकडे मदत मागतात. तसेच अभिनेता सोनू सूद सुद्धा स्वतःला जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करतो.
सोमवारी मात्र एका व्यक्तीने सोनूकङे वेगळीच मदत मागितली आहे. त्याने सोनूला म्हटले की,”भावा माझी गर्लफ्रेंड माझ्याकडे आयफोन मागत आहे. तिचं काही होऊ शŹकतं का? त्याच्या या प्रश्नावर अभिनेता सोनू सूद याने अतिशय मजेदार उत्तर दिले आहे.
उसका तो पता नहीं,
अगर iphone दिया तो पर तेरा कुछ नहीं रहेगा😂 https://t.co/t99rnT8z22— sonu sood (@SonuSood) June 22, 2021
21 जूनची ही घटना आहे. अभिनेता सोनू सूद ह्याने एक ट्विट रिट्वीट करत लिहिले की, “आणखी काही सेवा असेल तर सांगा.” त्याच्या याच ट्विटवर एका इसमाने लिहिले आहे की, “भावा माझ्या गर्लफ्रेंडला आयफोन हवा आहे, त्याचे काही होईल का बरं…”
त्यानंतर अभिनेता सोनू सूद याने अतिशय गंमतशीर उत्तर दिले आहे. त्याने लिहिले आहे की,”तिचं तर माहीत नाही भावा परंतु जर मी आयफोन दिला तर मात्र तुझं काहीच राहणार नाही.” सोनू सूद च्या या उत्तराला आतपर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आणि दोनशेहून जास्त लोकांनी शेयर केलं आहे.
सोनू सूद च्या या उत्तरावर त्या व्यक्तीने आणखी ट्विट करत म्हटले आहे की,”भावा तू तर सगळ्यांचे घर बसवतोस ना…मग माझे घर उजाङण्याच्या मागे का बरं लागला आहेस.”अभिनेता सोनू सूद यांच्या उत्तरावर त्यांचे फॅन्स भन्नाट खुश झाले. तसेच या ट्विटवर लोक जबरदस्त कमेंट्स करत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.