“तुझ्यामुळे माझ्या आईचे प्राण वाचले” सोनू सुदच्या या याच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमी…

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरस्टार असे आहेत. ज्यांना समाजातील लोकांना मदत करायची आवङ आहे. असाच एक सुपरहिट अभिनेता सोनू सूद. याला समाजकार्याची खूप आवड आहे. कित्येकदा तो स्वतःच्या पदरचे पैसे वापरून गरजू लोकांची मदत करतो. या कोरोना काळात देखील सोनू सूद याने अनेक लोकांना मदतीचा हात दिला.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन काळात देशातील कामगार आणि गरीब लोकांना निशुल्क बसेस व गाड्या आणि विमानांद्वारे घरी पोहोचण्यासाठी मदत केली. त्यामुळे त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. यासाठी स्पाईस जेट विमान कंपनीने अभिनेते सोनू सूद याचे अनोख्या स्टाईलने स्वागत केले होते. या कंपनीने सोनू सूद च्या कामाला सलामी देत आपल्या कंपनीच्या स्पाईस जेट बोईंग 737 वर त्याचे एक मोठे छायाचित्र काढले होते. तसेच त्यावर “अ सॅल्युट टू द सेव्हियर सोनू सूद” म्हणजेच “मसिहा सोनू सूदला सलाम” अशी ओळ सुद्धा लिहिली होती.

See also  बॉलीवूड अभिनेत्रीं पेक्षा ही सुंदर आहे सिंगर यो यो हनी सिंगची पत्नी, पहा तिचे सुंदर फोटो...

आता इंदौरमधील काही रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता होती. तेव्हा त्याने एकूण 10 ऑक्सिजन सिलेंडर पुरविले असून काही रुग्णांना इंजेक्शन देखील पुरवले आहेत. तसेच कोरोना काळात त्याने मास्क घाला आणि सुरक्षित अंतर ठेवा असे सुद्धा तो आपल्या चाहत्यांना सांगत आहे. यासाठी इंदोर मधील मंडळींनी सोशल मीडिया द्वारे त्याचे आभार मानले आहेत. एका युजरने तर कमेंट मध्ये म्हटले की,”माझ्या आईसाठी तुम्ही चार रेमङेसिवीर इंजेक्शन पाठवलेत, तिला मलेरिया, न्यूमोनिया आणि कोरोना हे सर्व एकत्र झाले होते. या इंजेक्शन मुळे तिचे प्रा’ण वाचले. तुमचे मनःपुर्वक आभार सर”

तर काही दिवसांपूर्वीच Sonu Sood याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते की, “माझी को’वि’ङ 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्यांना सोडवण्यासाठी अगोदरपेक्षा जास्त वेळ मिळेल. कारण मी स्वतःला क्लॉरनटाईन करून घेतले आहे. मी प्रत्येक वेळी तुमच्या सोबत आहे, हे सदैव लक्षात असू द्या.”

See also  "रितेश देशमुख सोबत लग्न करू नको, नाहीतर बरबाद होशील" असे म्हणत लोकांनी दिली होती चेतावणी, लग्नाच्या ८ वर्षानंतर जेनेलियाचा खुलासा...

आपला दिलेला शब्द सोनू सूदने पाळला आहे. कारण स्वतः आजारी असताना सुद्धा त्याने फक्त 15 मिनिटांत एका गरजू व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये बेङ मिळवून दिला. तसेच छोट्या पडद्यावरील दिग्दर्शक अरुण कुमार यांचा कॅमेरामन उमेश याला देखील केवळ 15 मिनिटांत हॉस्पिटलमध्ये आयसीयु मध्ये बेङ मिळवून दिला.

अशाप्रकारे अभिनेते सोनू सूद याने कोरोनाच्या बिकट परिस्थितीत एक देवदूत म्हणून अनेक गोरगरीब लोकांची मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यांच्या या समाजसेवेला आणि मदतीला खूप खूप सलाम.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close