सौरव गांगुलीच्या आयुष्यावर येणार तब्बल 250 कोटींचा बायोपिक, हा अभिनेता दिसेल मुख्य भूमिकेत…
आपल्या भारतीय संघाला कणखरपणा शिकवणारा कर्णधार सौरव गांगुली यानं बायोपिकसाठी होकार दिला आहे. त्यामुळे आता खूप लवकरच आपल्या भारताचा माजी कर्णधार हा मोठ्या पडद्यावर दिसेल. तर मोठ्या बॅनरच्या नावाखाली हा चित्रपट तयार केला जाणार असून त्याचा बजेट तब्बल 200 ते 250 कोटींचा आहे, असे म्हटले जात आहे.
यावर सौरव गांगुली म्हणतो की,”मी बायोपिक बनवण्यासाठी जरी तयार झालो असलो तरीही हा चित्रपट मात्र हिंदीत असेल. परंतु याचे दिग्दर्शन कोण करेल, हे मात्र मी आताच सांगू शकत नाही. सर्व गोष्टींचे नियोजन करण्यासाठी आणखी काही दिवस अवश्य लागतील.”
सौरव गांगुलीच्या आयुष्यावर तयार होणाऱ्या या चित्रपटाची कथा लिहिण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रोडक्शन हाऊस याविषयी सौरव सोबत चर्चा करत आहेत. परंतु या चित्रपटात सौरव गांगुलीची भूमिका कोण बरं साकारणार, यासाठी अभिनेता रणबीर कपूरचे नाव आघाडीवर घेतले जात आहे.
त्याचप्रमाणे गांगुलीने देखील स्वतःच रणबीर कपूरचे नाव घेतले आहे. मात्र या भूमिकेसाठी आणखी दोन अभिनेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. तर एकंदरीत सौरव गांगुलीच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखविला जाणार आहे. त्यामुळे हा चित्रपट केव्हा रिलीज होईल, याची अद्यापही तारीख मात्र ठरली नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.