साऊथ अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतले रजनीकांत यांच्या शेजारी नवीन घर, घराची किंमत ऐकून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अभिनेत्री नयनतारा ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या अभिनया व्यतिरिक्त ती नेहमीच पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. तर सध्या ती आपल्या नवीन घरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार नयनतारा ने हल्लीच तामिळनाडूची राजधानी चेन्नई च्या पोस गार्डन मध्ये नवीन घर घेतले आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कर्नाटकातील या अभिनेत्रीने सुपरस्टार रजनीकांत यांच्या बंगल्याजवळ स्वतःचे नवीन घर घेतले आहे. तसेच “रांझणा” फेम अभिनेता धनुष सुद्धा तिथेच जवळपास राहतो. काही शुभ मुहूर्त पाहिल्यावर अभिनेत्री नयनतारा ही लवकरच आपल्या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे.

See also  सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध 'ही' साऊथ अभिनेत्री लवकरच करणार बॉलीवुडमध्ये पदार्पण, जाणून घ्या कोणता आहे चित्रपट...

मीडियाच्या माहितीनुसार नयनतारा ही लवकरच आपला प्रियकर विघ्नेश शिवनसोबत विवाहबद्ध होणार आहे. या दोघांनीही आपल्या लग्नाचे प्लॅनिंग केले आहे. हे कपल सोशल मीडियावर एकमेकांबद्धल प्रेम व्यक्त करत असते. तर आता लवकरच हे ब्युटीफूल कपल विवाहबंधनात अडकणार आहे. परंतु अजूनपर्यंत या दोघांनी स्पष्टपणे काही सांगितले नाही.

अभिनेत्री नयनतारा हिच्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले, तर रजनीकांत स्टारर “Annaatthe” या चित्रपटाद्वारे तिला हल्ली खूप प्रसिद्धी मिळत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सुद्धा सगळीकडे भरपूर कौतुक केले जात आहे. तर सध्या ती “गॉडफादर” या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिने “कथू वाकुला रेंदू कादळ” चे शूटिंग पूर्ण केले आहे.

“कथू वाकुला रेंदू कादळ” हा चित्रपट नयनतारा चा प्रियकर विघ्नेश शिवन हा दिग्दर्शित करत असून विजय सेतुपती सोबत ती यामध्ये काम करत आहे. आतापर्यंत तमिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांत काम केलेली ही अभिनेत्री नयनतारा बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये लवकरच पदार्पण करत आहे. दिग्दर्शक एटली यांच्या चित्रपटातून ती हिंदी चित्रपटात किंग खान शाहरुख सोबत काम करणार आहे.

See also  अभिनेता राजकुमारचा "जानी" दु'श्म'न असलेला हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आज आहे अब्जाधीश, नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment