ना परीक्षा, ना तणाव तरीही दहावीचे ‘एवढे’ विद्यार्थी’ नापास, ‘एवढ्या’ शाळांचा शून्य टक्के निकाल , जाणून घ्या दहावच्या निकालाची आकडेवारी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थी आणि इतर कर्मचार्‍यांच्या सुरक्षेला प्राथमिकता देत राज्य सरकारने हा निर्णय घेतला. परिक्षाच नसल्यामुळे 100% निकाल लागेल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, परीक्षांचे अजिबात टेंशन नसतानाही शेकडो विद्यार्थी दहावीत नापास झाले आहेत.

काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत आज दहावीचा निकाल दुपारी एक वाजता पासून ऑनलाइन उपलब्ध होईल असे जाहीर केलं होतं. आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर झाला.

कोकण विभाग अव्वल

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. निकाल जाहीर करत असताना त्यांनी नेमके आकडे न सांगता टक्केवारी सांगितली. त्यामुळे नेमके किती विद्यार्थी नापास झाले स्पष्ट सांगता येणार नाही. यंदा राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. यात कोकण विभाग अव्वल आला असून, कोकणचा निकाल 100 टक्के लागला आहे. यावेळीही मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाला 99.96 टक्के तर मुलांचा निकाल 99.94 टक्के लागला आहे. तसेच काही हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

See also  भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे सोंगाड्या आहेत, 'या' भाजप नेत्याने केली जहरी टीका

या कारणांमुळे निकाल राखीव ठेवण्यात आले?

राज्यातील तब्बल 4,922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. यात बहुतांश विद्यार्थी रिपीटर्स आहेत, ज्यांचे मागील 3 ते 4 वर्षांच्या गुणपत्रिका तपासून मूल्यांकन करणे बाकी आहे. काही जुन्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध होणे बाकी असल्यामुळे त्यांचा निकाल उशिरा लागणार आहे.

निकालातील काही ठळक मुद्दे:

  • दहावीच्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नेहमी प्रमाणे मुलींचा निकाल मुलांपेक्षा जास्त आहे.
  • या वर्षी 957 मुलांना 100% गुण मिळाले आहेत..
  • 83,262 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
  • 12,384 शाळांचा निकाल 100% लागला आहे.
  • 9 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment