भारतातील स्टॅण्डअप कॉमेडी करणाऱ्या या कलाकारांची फी आहे इतकी महागडी, जाणून घ्या कोण आहेत..
मित्रहो अभिनय हा अनेक प्रकारचा असतो, कधी प्रीतीत न्हाऊन निघालेल्या प्रियकरांचा अभिनय करायचा असतो तर कधी रागाने रणांगण लढवायचे असते पण या सगळ्यातही दर्जेदार मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनय प्रत्येक चित्रपटात आणि मालिकेत पाहायला मिळतो. कॉमेडी मुळे रसिक मंडळी खळखळून हसतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज निर्माण होते. म्हणून तर कॉमेडी चित्रपट किंवा मालिका अनेकांना खूप आवडतात, काहीजण स्टॅण्डअप कॉमेडी देखील अतिशय सुंदर साकारतात. मित्रहो आज आपण भारतातील टॉम स्टॅण्डअप कॉमेडी करणाऱ्या कलाकारांची माहिती घेणार आहोत, तसेच त्यांची फी सुद्धा जाणून घेणार आहोत.
१) कुणाल कामरा :- कुणाल यांची कॉमेडी अनेकांनी पाहिली आहे, त्यांच्या कॉमेडीचे भरपूर लोक चाहते आहेत. अगदी स्टेज, युट्युब पासून, ट्विटर पर्यंत कुणाल चर्चेत असतात. कुणाल हे एक महागडे कॉमेडीयन मानले जातात, त्यांच्या कमाईचे अनेक सोर्स आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या कार्यक्रमात आपला शो करत असतात, कार्यक्रमानुसार ते आपली फी आकारतात.
२) जाकीर खान :- जाकीर खान यांची कॉमेडी देखील प्रचंड लोकप्रिय आहे, उभ्यानेच प्रेक्षक मंडळींना खळखळून हसवण्याची कला त्यांच्या कडे आहे त्यामुळे अनेकजण त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. जाकीर देखील आपल्या शो साठी खूप जास्त फी घेतला, एका शो साठी त्यांची फी जवळपास ३-४ लाख इतकी सांगितली जाते.
३) विश्वा कल्याण रथ :- विश्वा कल्याण रथ हे देखील खूप छान कॉमेडी करतात, त्यांच्या कॉमेडीचे अनेक लोक खूप मोठे चाहते आहेत. त्यांची नेट्वर्थ जवळपास ३०-४० लाख सांगितली जाते. त्यांच्या शो ची कमाई जवळपास ३० हजार होत असते.
४) कनन गिल :- कनन गिल हे अतिशय लोकप्रिय कॉमेडीयन आहेत. देशात व परदेशात त्यांचे जवळपास १००० हुन अधिक शो झाले आहेत. त्यांची कमाई ही विकली जाणारी तिकिटे आणि शो यावर अवलंबून असते. एका शो ची कमाई जवळपास २० हजार पर्यंत आकारते.
५) अपूर्व गुप्ता :- अपूर्व हे उत्कृष्ट कॉमेडी करतात, त्यांचा विनोदी अभिनय अतिशय सुंदर असतो. देशा विदेशात त्यांचे आजवर १५०० हुन अधिक शो झाले आहेत. अपूर्व हे एका शो मधून ३० हजार रुपये कमाई करतात.
६) गौरव कपूर :- गौरव इतकी सुंदर कॉमेडी करतात की त्यांचे शो नेहमी हाऊसफुल असतात. इतकेच नव्हे तर युट्युब वर सुद्धा त्यांची खूप चर्चा होत असते. त्यांच्या कमाईतून त्यांच्या शो ला जवळपास ४० हजार पर्यंत होते.
मित्रहो स्टॅण्डअप कॉमेडी खूप छान वाटते, यातुन अनेक कलाकार प्रचंड कमाई करतात. पब्लिक शो, कार्पोरेट शो, युनिव्हर्सिटी कॉलेज फेस्टिवल शो तसेच ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कमाई होते. हिंदू आणि इतर मीडिया रिपोर्ट्स नुसार एक स्टॅण्डअप कॉमेडीयन शो मधून कमीत कमी २० हजार रुपये कमावतो. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.