युट्युब वर धुमाकूळ घालणारी वेब सिरीज ‘गावरान मेवा’ मधील सरपंच आहे तरी कोण?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय असणारी गावरान मेवा ही वेबसेरीज प्रसिद्धीचे नवे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे .ही वेबसीरीज जगभरात अमेरिका, सिंगापूर ,सौदी अरेबियासारख्या देशातही आपले हजारो चाहते निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे .या गावरान मेवाच्या एक एका एपिसोडला 10 मिल्लियन म्हणजेच एक करोड पर्यंत views मिळालेले आहेत.

517 1

Advertisement

तर या वेबसिरीज चे लेखक आहेत किरण बेरड. यांच्याविषयी आपण आज जाणून घेऊ. किरण बेरड यांचे गाव सोनेवाडी हे नगर शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर चांदबिबी महालाजवळ आहे .लेखक किरण बेरड यांचे सर्व शिक्षण सरकारी शाळेमध्ये झाले. बारावीनंतर डीएड ला प्रवेश घेऊन त्यांनी आपला वर्तमानपत्र विक्रीचा ही व्यवसाय सुरू केला.

See also  नाशिक करंसी नोट प्रेस मध्ये कोणी चोरी केली? झाला खुलासा, ऐकून धक्का बसेल

घरोघरी वर्तमानपत्र टाकत असताना भाजीपाला विक्रीही सुरू केली .वडील केंद्रीय कर्मचारी असतानाही ‘बाप’ कमाईपेक्षा किरण बेरड यांनी ‘आप’ कमाई ला प्राधान्य दिले .डीएड च्या शिक्षणानंतर जिल्हा परिषद शिक्षकाची सरकारी नोकरी चालून आली. परंतु या तरुणाचं ध्येय वेगळंच होतं . स्वतःचं किराणा मालाचं दुकान टाकून या माणसानं स्वतःच्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवर पहिले पाऊल ठेवले.

Advertisement

516 1

याच दुकानाच्या काउंटरला लिखाणाचा टेबल बनवत हा तरुण नवनव्या संकल्पना कागदावर उतरू लागला. अगोदर दैनिक देशदूत मध्ये आणि नंतर दैनिक सकाळमध्ये या तरुणाच्या वात्रटिका वाचकांच्या हृदयाचा ठाव घेऊ लागल्या . 2015 साली या तरुणाने ‘इपितर’ या चित्रपटाची कथा, पटकथा ,संवाद लिहून निर्मितीदेखील केली .त्यानंतर 2018 मध्ये या बिग बजेट ‘रे राया ‘ या खेळावर आधारित चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली.

See also  अक्षय, तू घाबरू नकोस ! छत्रपती संभाजीराजे भोसले तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी
Advertisement

हे दोन्ही चित्रपट दणक्यात प्रदर्शित झाले .त्यानंतर या तरूणाने मागे वळून पाहिलेच नाही.नंतर गावरान मेवा या वेब सिरीज चे लिखाण सुरू केले .अगोदर स्टार मराठी युट्युब चॅनेल वर आणि आता कडक मराठी युट्युब चॅनेल वर ही वेबसिरीज अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. याच वेबसेरीज मध्ये किरण बेरड हे सरपंचांची भूमिका साकारत असून महाराष्ट्राचा लाडका सरपंच अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

515 1

Advertisement

त्यांची आगामी वेबसिरीज ‘गाव लई न्यारं ‘ ही स्टार मराठी या युट्युब चॅनलवर तर ‘गावरान गप्पा’ हा टॉक शो कडक मराठी या युट्युब चॅनल वर सुरू होत असून त्यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. या लिखाणामध्ये ॲक्शन कॉमेडी करणाऱ्या त्यांच्या मित्राची म्हणजेच नामदेव गव्हाणे यांचीही त्यांना साथ लाभत असते. पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्रातील लेखकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ‘वर्ड बँक’ नावाची संपूर्ण भारताला लिखाण पुरवणारी कंपनी सुरू केली .या कंपनीत दीडशेच्या वर लेखक लिखाण करत आहेत .

See also  तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; या महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे उपाय, यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

गावरान मेवा हिट होण्यामध्ये अजून दोन व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे दिग्दर्शक दीपक देशमुख आणि सिनेमॅटोग्राफर अशोक भोंगळ यांचा. हे दोघे जण सुरुवातीपासून या वेबसेरीज चा डोलारा सांभाळत आहेत.

Advertisement

अशा या संपूर्ण महाराष्ट्राला मनमुराद ,खळखळून हसवणाऱ्या ध्येयवेड्या मराठी लेखकासाठी आपण मराठी असल्याने एक शेअर जरूर करायलाच हवा.

Advertisement

Leave a Comment

close