या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला झालीय को-रो-नाची लागण, ट्विटर वर स्वतः पोस्ट करुन दिली चाहत्यांना माहिती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

को-रो-नाच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात देखील कोरोना ने थैमान घातले असून अनेक मोठ्या सेलिब्रिटिजना देखील याची लागण झालेली ऐकायला मिळत आहे.

आपल्या मराठी चित्रपट सृष्टी मधील एका दिग्गज मोठ्या अभिनेता दिग्दर्शकाला को-रो-नाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते सुबोध भावे यांच्या को-रो-नाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉ-झि-टि-व्ह आला आहे.

त्यामुळे मराठी चित्रपट इंडस्ट्री सोबतच त्यांच्या त्यांच्या असंख्य चाहत्यां मध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुबोध भावे यांच्या बरोबरच त्यांच्या घरातील दोन सदस्यांना देखील को-रो-ना झाला आहे. यात त्यांची पत्नी म्हणजे मंजिरी व मोठा मुलगा कान्हा यांचा समावेश आहे.

See also  तृतीयपंथीयांना बुधवारीच दानधर्म का करतात? किन्नरांना दान करताना चुकूनही करू नका ही चूक नाही तर...

त्यांचा लहान मुलगा मल्हार याला सुदैवाने को-रो-नाची लागण झालेली नाही. सुबोध भावे यांनी स्वतः ट्विटरवर पोस्ट करुन सांगितले की, ”मी, मंजिरी व माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही को-रो-नाची लागण झाली आहे.

आम्ही सर्वांनी घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने उपचार घेत आहोत. गणपती बाप्पा मोरया” तसेच सुबोधने त्याच्या सर्व चाहत्यांना ही स्वतःची काळजी घेण्यास व सुरक्षित राहण्यास देखील सांगितले आहे.

सुबोध भावे हे काही दिवसापूर्वी झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळेच त्यांना को-रो-नाची लागण झाली असावी. त्या सोहळ्याला अन्य मराठी कलाकार देखील उपस्थित होते.

त्यामुळे त्यांची देखील टेस्ट होण्याची दाट शक्यता आहे. सर्व मराठी कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी सुबोध भावे आणि त्यांच्या परिवाराला को-रो-नाच्या संकटातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment