रिक्षाचालकाच्या मुलीनं केली अभिमानस्पद कामगिरी! कोल्हापूरच्या अमृताला जागतिक कंपनीने दिले तब्बल 41 लाखांचे पॅकेज…
कोल्हापूर: सध्या सोशल मीडियावर एक प्रेरणादायी यश मिळालेल्या सर्वसामान्य मुलीची असामान्य गोष्ट खूप व्हायरल होत आहे. म्हणतात ना की जर आयुष्यात ध्येयाप्रति मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर मग कोणत्याही अडथळ्यांना पार करून यशाची वाट शोधली जाऊ शकते. शोधली जाऊ शकतेच काय तर भेटतेच. आणि हे असं यश करून दाखवलं आहे कोल्हापूरच्या एका रिक्षाचालकाच्या मुलीने.
तिने नुकतंच संगणक क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलं। आणि हे करताच तिच्या आयुष्यात आनंदाची, अभिमानाची गोष्ट घडलेली आहे. तिचं संगणक कौशल्य पाहून जागतिक स्तरावरील एका कंपनीने तिला तब्बल 41 लाखांचे पॅकेज दिलेले आहे. ज्यामुळे तिचं सगळीकडून अभिनंदन करण्यात येत आहे. अत्यंत गरिबीतून तिने या यशाचं शिखर गाठलेलं आहे.
जिला ही ऑफर मिळाली आहे तिचे नाव आहे अमृता विजयकुमार कारंडे (Amruta Vijaykumar Karande). ही गुण संपन्न मुलगी केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या संगणक शास्त्र विभागात शिकत आहे. आणि इथेच तिच्या ज्ञानाची पायाभरणी झाली. गरिबीचा तिने कधीच न्यूनगंड बाळगला नाही. उलट जोमाने अभ्यास केला. आणि आज तिने आई वडिलांची, कोल्हापूरची आणि राज्याची मान अभिमानाने वर उंचावलेली आहे.
अमृता विजयकुमार कारंडे (Amruta Vijaykumar Karande) असं या गुणी मुलीचं नाव असून ती केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या संगणक शास्त्र विभागात शिकत आहे. अमृत ही सर्वसामान्य कुटुंबातील असून तिचे वडील रिक्षा चालवतात तर आई गृहीणी आहे. जागतिक स्तरावरील अॅडोब कंपनीत अमृताची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे.
तिला कंपनीनं प्री प्लेसमेंटद्वारे 41 लाखांचं पॅकेज देऊ केलं आहे. याबाबतच पत्र नुकतंच अॅडोब कंपनीकडून पाठवण्यात आलं आहे. तिच्या या यशानं महाविद्यालयातूनही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अमृता चे वडील हे रिक्षाचालक आहेत.
तर आई गृहिणी. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन तिने हे असामान्य यश मिळवलं आहे. जागतिक स्तरावरील अॅडोब कंपनीत एका रिक्षाचालकाची सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेली असामान्य मुलगी अमृताची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे.
बरं नुसती निवड नाहीतर तब्बल तिला कंपनीनं प्री प्लेसमेंटद्वारे 41 लाखांचं पॅकेज देऊ केलं आहे. याबाबतच पत्र नुकतंच अॅडोब कंपनीकडून पाठवण्यात आलं आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वांना खूप अभिमान आहे. खरच ! मुलगी शिकली प्रगती झाली. आता इथून पुढे तरी आनंदाने पेढे वाटून म्हणावे, अहो मुलगी झाली हो !… तिचं खूप खूप अभिमान अभिनंदन व पूढील भावी वाटचाली साठी शुभेच्छा !..