आपल्या ड्रायव्हरसोबत गैरवर्तन केल्यामुळे “या” प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी होत आहे जबरदस्त ट्रोल…
बॉलीवुडचा ढिंकचाक अभिनेता ऋतिक रोशन याची पहिली पत्नी सुजैन खान ही आपल्या जबरदस्त लुकमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर सुद्धा सुजैन नेहमी एक्टिव असते. आपले हटके ग्लॅमरस फोटोज् शेयर करत ती नेटकर्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेते. तुम्हांला ठाऊक असेलच की सुजैन खान ही अभिनय क्षेत्रात काम करत नसली तरीही तिचे नखरे हे कोणत्याही अभिनेत्री पेक्षा मुळीच कमी नाहीत.
याचा अंदाज तुम्ही सोशल मीडियावर एक नजर टाकली, तर तुम्हांला नक्कीच येईल. इतकंच नव्हे तर तिचे एकापेक्षा एक भन्नाट फोटोज् पाहून तिच्या आलिशान लाइफस्टाइलचा आपण अंदाज लावूच शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर सुजैन च्या फॉलोअर्सची संख्या सुद्धा खूप मोठी आहे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे ऋतिक रोशन मुळेच तिला पब्लिसिटी मिळत असते. या दोघांचा घटस्फो’ट जरी झाला असला, तरीही आज सुद्धा हे दोघेही एकमेकांसोबत एकत्रित वेळ घालवताना दिसतात.
नेहमी आपल्या चाहत्यांची वाहवा मिळवणारी सुजैन खान ही आता मात्र नेटकर्यांच्या सं’तापाचे कारण ठरली आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे तिला जबरदस्त प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. ऋतिक रोशनची प्रिय पत्नी सुजैन खान हिचा हा व्हिडीओ पाहून तुमची देखील तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सुजैनचा हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक व्यक्ती तिला दोष देत आहे.
अहो, पण सुजैन ने नेमका कोणता अपराध केला बरं… तर त्याचे झाले असे की, सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओत सुजैन आपल्या कारमधून बाहेर उतरल्यावर ङ्रायव्हर च्या हातातील छत्री घेऊन ती तशीच निघून गेली. पण तिचा ङ्रायव्हर बिचारा तसाच पावसात भिजत उभा राहिला.
सुजैन खानचे हेच वागणे सर्व नेटकर्यांना भरपूर खटकले. याच कारणामुळे सुजैनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सर्वांनी सुरुवात केली. त्यामुळे सध्या सुजैन बद्दल प्रचंड राग व्यक्त करत हा व्हिडीओ वायरल केला जात आहे. नेहमी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे तिचे फॅन्स सुद्धा आता तिच्यावर टीका करू लागले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.