‘तारक मेहता’मध्ये नव्या अंजली मेहताने केली एण्ट्री; ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार अंजलीची भूमिका…

Advertisement

.

लॉकडाउननंतर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सुरू झाली आहे, पण या मालिकेशी संबंधित अशा बातम्या सतत समोर येत आहेत, ज्यामुळे चाहते अजिबात खूश नाहीत.

Advertisement

गुरचरण सिंगने या शोला निरोप दिल्यानंतर आता अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहतानेही हि मालिका सोडल्याची बातमी समोर येत आहे. फक्त हेच नव्हे तर बातमीनुसार निर्मात्यांना शोसाठी एक नवीन अंजली मेहतासुद्धा मिळाली आहे.

neha mehta hot hd photos mobile wallpapers 1080p gbmx 1075x1075 1

Advertisement

एका वृत्तानुसार, टीव्ही अभिनेत्री सुनैना फौजदार ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये नेहाची जागा घेणार आहे. रविवारपासून ती या शोचे शूटिंग सुरू करणार असल्याच्या बातम्याही आहेत. गेल्या 12 वर्षांपासून अंजलीच्या रुपात प्रेक्षकांच्या मनामध्ये असलेली नेहा आता हा शो सोडत आहे.

See also  एकेकाळी दोन वेळेच्या जेवणाला तरसत होती अभिनेत्री भारती सिंग, आज आहे करोडोंची मालकीण...

त्यामुळे चाहते सोशल मीडियावर आपली नाराजी व निराशा व्यक्त करीत आहेत. पण 12 वर्षांपासून या शो मध्ये काम करणाऱ्या नेहाने या शो पासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला हे आतापर्यंत निर्मात्यांनी सांगितलेले नाही.

Advertisement

101106617 258058195402175 743245175961314064 n 1

तसे, जर आपण सुनैना फौजदार बद्दल बोललो तर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे जिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलेले आहे. ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ पासून ‘बेलन वाली बहु’ पर्यंत अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. आता ती अंजलीची भूमिका साकारणार आहे, पण ती हि भूमिका कशी साकारते आणि प्रेक्षकांना ती आवडेल का हे आता पाहावे लागेल.

Advertisement

त्याचबरोबर मालिकेमध्ये रोशनसिंग सोढी म्हणून सर्वांना परिचित असलेल्या गुरचरण सिंगनेही हि मालिका सोडली आहे. बलविंदरसिंग सूरी यांनी त्यांची जागा घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. ही दुसरी वेळ आहे जेव्हा गुरचरण सिंगने हि मालिका सोडली आहे.

See also  अंकिता लोखंडेने ब्रेकअप नंतरही या कारणांमुळे सुशांतसिंग राजपूतचे फोटो घरात ठेवले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

काही वर्षांपूर्वीदेखील त्याने या मालिकेतून सुट्टी घेतली होती. पण नंतर निर्मात्यांनी त्याला समजावल्यानंतर तो परत आला होता. पण यावेळी त्याला परत आणणे कठीण झाले आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close