“सुंदरा मनामध्ये भरली” फेम लतीकाची बहीण सुद्धा आहे लोकप्रिय अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री…
काही वर्षांपूर्वी एक मराठी सिनेमा आला होत्या ज्यामध्ये बालपणी सुंदरा मनामध्ये भरली फेम अभिनेत्री असणारी लतीकाची भूमिका करणारी च्या बहिणीने काम केलं आहे. जी भूमिका ही खूप गाजली होती. रसिकांच्या मनामध्ये घर करून बसली होती. तर तिच्याबद्दल आज आपण काहीसं जाणून घेणार आहोत. चला सविस्तर माहिती घेऊ.
१९९८ साली निशिगंधा वाड आणि दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट अशी ज्ञानेश्वरी त्यावेळी खूपच गाजला होता. या चित्रपट निशिगंधा वाड आणि रमेश भाटकर यांच्याशिवाय कुलदीप पवार, सुहास पळशीकर, सयाजी शिंदे, नंदू माधव यांच्या देखील महत्वाच्या भूमिका होत्या. मोठी स्टार कास्टिंग असलेल्या सिनेमात तिने काम केलं होतं आणि तेही अगदी लहानपणी. ही खूप मोठी गोष्ट.
या चित्रपटात चिमुरड्या ज्ञानेश्वरीमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलते हे या चित्रपटात दाखवले गेले होते. या चित्रपटात चिमुरडी ज्ञानेश्वरीची भूमिका साकारली होती अक्षता नाईक हिने. अक्षता नाईक ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरलीमध्ये लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक हिची सख्खी बहिण आहे. आता दोन्ही बहिणीचे नावं 90 टक्के सारखीच वाटतात म्हणून घोळ होऊ शकतो तो काही होऊ देऊ नका.
अभिनेत्री अक्षता नाईक ( akshata naik ) ही अशी ज्ञानेश्वरी या चित्रपटाचे निर्माते अरविंद नाईक यांची कन्या आहे. अक्षता प्रॉडक्शन्स या त्यांच्या निर्मिती संस्थेतूनच अशी ज्ञानेश्वरी चित्रपट बनवण्यात आला होता. अक्षता आणि अक्षया या त्यांच्या दोन मुली आहेत. ज्या आज दोघी ही मराठी सिने आणि मालिका क्षेत्रात आपला अभिनयाचा ठसा उमटवत आहेत.
लहानपणी केलेल्या चित्रपटानंतर मात्र अक्षता फारशी कुठल्याच चित्रपटात दिसली नसली तरी तिची धाकटी बहीण अक्षया नाईक ( akshaya naik ) कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेत लतिकाच्या मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहे.
मराठीमधील ही तिची पहिलीच मालिका आहे. याशिवाय अक्षयाने फिट इंडिया या चित्रपटात देखील काम केले आहे. अक्षतापेक्षा तिची धाकटी बहीण अक्षयाने अभिनय क्षेत्रात आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे.
अक्षताचे आता लग्न झाले असून सध्या ती तिच्या कुटुंबासोबत मुंबईतच स्थायिक आहे. अक्षयाप्रमाणेच अक्षताला देखील डान्सची विशेष आवड आहे. या दोघींचे डान्सचे व्हिडीओ अक्षया सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसते.
तब्बल २२ वर्षानंतर दिसलेल्या या अक्षताला फार कमी लोकांनी ओळखली असावी. अक्षता अभिनयापासून लांब असली तरी मराठी चित्रपटातील बालकलाकार म्हणून ती कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहेल.
मराठी टेलिव्हिजन मालिका मध्ये असे अनेक उदाहरणे आहेत की बहिणी बहिणी दोघी काम करतात. जसे की मृनमयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. तश्या या. या दोघींना ही पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.