‘सुंदरा मनामधे भरली’ मालिकेमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम या प्रसिद्ध अभिनेत्रीची मालिकेत दमदार एन्ट्री…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेत्री आणि गायिका म्हणून ओळख असलेली स्वानंदी टिकेकर लवकरच सुंदरा मनामधे भरली या मालिकेत दिसणार आहे. अभिमन्यू आणि लतिका यांच्या प्रेमकथेला एक मनोरंजक वळण मिळाले आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनाही स्वांदी कोणत्या भूमिकेत दिसणार आहे याची उत्सुकता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नव्या कलाकारांची एंट्री झपाट्याने होत आहे. मालिकेत जर संथपणा आला असेल तर त्या ठिकाणी नव्या पात्राची एंट्री होऊन हा संथापणा कमी होण्यात मदत होते, असे चित्र पाहायला मिळते. या आधी वीणा जगतापने ‘तुझ्या माझा संसाराला आणि काय हवं’ मालिकेत एका नव्या पात्रात प्रवेश केला होता, आता वीणा ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत दिसून येत आहे.

See also  'तुझ्यात जीव रंगला' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने एका वर्षापूर्वीच या अभिनेत्यासोबत केला होता साखरपुडा, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री अश्विनी कासार ही देखील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत दिसली होती. मालिकेतील हा बदल कधी प्रेक्षकांना आवडतो तर कधी प्रेक्षकांना आवडत नाही, पण हा फंडा आता वापरला जात आहे हे मात्र सत्य आहे. ‘जास्त वजन असलेल्या मुलीचं आणि फिटनेस प्रेमी मुलाचं लग्न झालं तर त्यांचं प्रेम कसं फुलणार?’ साधारण या लव्ह ट्रॅकवर ‘सुंदरा मनामधे भरली’ ही मालिका सुरू झाली होती.

या मालिकेत अभिमन्यू आणि लतिका ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. जास्त वजन असलेल्या मुलींना समाजात लग्नासाठी नेहमीच नकार दिला जातो, पण सौंदर्य हे फक्त दिसण्यात नसते हा संदेश देणारी ही मालिका टीव्हीच्या जगात लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेने रंजक वळण घेतले असून, याच वेळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या मालिकेत प्रवेश करणार आहे.

See also  “ज्योतिबाच्या नावाने चांगभलं” या मालिकेत ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

स्वानंदीची भूमिका काय असेल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तिच्या चाहत्यांना काही दिवसांतच तिला पुन्हा एकदा अभिनयात पाहण्याची संधी मिळणार आहे.’दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील स्वानंदीने साकारलेली व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली. त्यानंतर ती मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये सुद्धा दिसली. ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर हे स्वानंदीचे वडील असून तीला अभिनयाचा वारसा त्यांच्याकडूनच मिळाला आहे. स्वानंदी ला संगीताचा वारसा तिची आई गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडून मिळाला आहे.

विशेष म्हणजे ती एक उत्तम गायिका असण्यासोबतच एक अभिनेत्री देखील आहे. स्वानंदी सिंगिंगस्टार या रिअॅलिटी शोची विजेती होती. त्यानंतर ‘अस्सं सासर नको ग बाई’ या मालिकेत ती नायिका म्हणून दिसली पण ही मालिका फार काळ टिकली नाही. सुंदर मना मधे भरली या मालिकेत अभिलाषाची भूमिका साकारणारी राधा सागर नुकतीच मालिकेतून बाहेर पडली आहे.

See also  'हे मन बावरे' या लोकप्रिय मालिकेतील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं दुसऱ्यांदा लग्न, पहा लग्नाचे फोटो...

आता मालिकेला नवा ट्विस्ट देणारी स्वानंदी या मालिकेत दिसणार असल्याची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतील नायिका अक्षय नाईकचा अपघात झाला आणि त्याने मालिकेच्या कथेत काही बदल केले. त्यानंतर स्वानंदीच्या आगमनाने मालिका कोणते वळण घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या तरी या मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी ती तयारी करत असून लवकरच ती पडद्यावर दिसणार आहे.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment