राज कुंद्राच्या बहाण्याने कॉमेडियन सुनील पालने साधला मनोज वाजपेयी आणि पंकज त्रिपाठी वर निशाणा, म्हणाले मी अशा लोकांचा द्वेष करतो
सुनील पाल यांच्या कॉमेडीने लाखो लोकांची मने जिंकली पण आता त्यांनी मनोज वाजपेयीबद्दल जे काही बोलले त्यामुळे सर्वांनाच चकित केले आहे. तर जाणून घेऊया काय म्हणाले सुनील पाल?
सेन्सॉरशिप नसल्याचा फायदा मोठे लोक घेत आहेत
आपणा सर्वांना ठाऊकच आहे की, अश्लील चित्रपट बनवल्याच्या आरोपात राज कुंद्रा पोलिस कोठडीत आहे. माध्यमांशी बोलत असताना सुनील पाल यांना राज कुंद्रा प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया देण्यास सांगितले. तेव्हा सुनील पाल राज कुंद्रावर बोलताना त्यांनी मनोज बाजपेयी यांना लक्ष्य केले. ‘वेब सिरीज असो वा इतर काही, मोठे लोक तिथल्या सेन्सॉरशिपच्या कमतरतेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. सध्या बनत असलेल्या वेबसिरिज आपण घरी पाहू शकत नाही.’
मनोज वाजपेयी सारख्या कलाकारांचा मी द्वेष करतो..
दरम्यान, त्यांनी मनोज वाजपेयीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ”मनोज वाजपेयी एवढा खालच्या दर्जाचा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही.” ते पुढे म्हणाले, “ मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मनोज वाजपेयी सारख्या अजून 3-4 व्यक्तींचा मी द्वेष करतो. ती कितीही मोठे अभिनेते असले तरी त्यांच्या एवढे बदमाश आणि खालच्या दर्जाचे व्यक्ती मी पाहिले नाहीत.”
कौटुंबिक प्रेक्षकांसाठी काय करत आहेत?
सुनील पाल यांनी मनोज वाजपेयी सारख्या कलाकारांना प्रश्न विचारला की, तुम्ही सगळे कौटुंबिक प्रेक्षकांसाठी काय करत आहात? तुम्ही अशा वेबसिरिज बनवत आहात ज्यामध्ये तुमच्या पत्नीचे दुसर्या सोबत लफडे आहे आणि तुमचे दुसरी सोबत लफडे आहे. तुमची मुलगी तिच्या प्रियकराविषयी बोलत आहे, मुलगा वयापेक्षा मोठ्या व्यक्तीसारखे वागत आहे. हे कसले कुटुंब आहे?
पंकज त्रिपाठीवरही प्रश्न उपस्थित केले
सुनील पाल यांनी मनोज बाजपेयी व्यतिरिक्त अली फजल, पंकज त्रिपाठी यांची वेबसिरिज ‘मिर्झापूर’वरही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांना असभ्य म्हटले. ‘मिर्झापुर नावाचा शो असभ्य लोकांनी बनवला आहे. मल ते बिलकुल आवडत नाहीत. या गोष्टींवर बंदी आणली पाहिजे. कारण हेसुद्धा पॉर्न आहे. आपण जे पाहतो फक्त तेच पॉर्न नसते, विचार सुद्धा पॉर्न असतात.”
राज कुंद्रा विषयी म्हणाले…
राज कुंद्रा प्रकरण बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या विषयावर प्रत्येकाची वेगळी प्रतिक्रिया समोर येत आहे. सुनील पाल राज कुंद्रावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, “जे झाले ते होणार होते आणि ते गरजेचे होते.”