कतरिनाची मराठमोळी जाऊबाई आहे तिच्यापेक्षाही अधिक बोल्ड व ग्लॅमरस, पहा तिचे ग्लॅमरस फोटोज्
बॉलीवुड इंडस्ट्रीची क्यूट अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल हे कपल नुकतंच विवाहबंधनात अडकले आहे. हे दाम्पत्य हनिमूनहून परतल्यावर लगेचच आपापल्या कामात बिझी झाले. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, या लग्नामुळे कतरिनाचा दीर सनी कौशल आणि त्याची गर्लफ्रेंड शर्वरी वाघ हे दोघे प्रचंड चर्चेत आले आहेत. शर्वरी व सनी या दोघांनीही “द फॉरगॉटन आर्मी” या चित्रपटात एकत्रित काम केले आहे. त्याच दरम्यान सेटवर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे म्हटले जात आहे. या कपलचे काही फोटोज् हे सोशल मीडियावर सध्या भरपूर प्रमाणात वायरल होत आहेत.
विक्कीचा भाऊ सनी कौशल याने नुकतेच “शिद्दत” या चित्रपटातून पदार्पण केले आहे. तर त्याची गर्लफ्रेंड शर्वरी वाघ हिने “बंटी और बबली 2” मधून इंङस्टीमध्ये पदार्पण केले आहे. मात्र या पहिल्याच चित्रपटातून शर्वरीने बिकनी घालून आपल्या हॉट व मादक अदा दाखविल्या आहेत.
कतरिना कैफची जाऊबाई शर्वरी वाघ ही सुद्धा आपल्या बोल्ड स्टाईल साठीच प्रसिद्ध आहे. आपले फोटोज् ती चाहत्यांसोबत नेहमी शेयर करते. शर्वरीने पहिल्याच चित्रपटात किसींग सीन व बोल्ड सीन दिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर शर्वरी सध्या अफलातुन प्रसिध्दीत झळकत असल्याचे दिसते.
शर्वरी वाघ ही महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मूलगी आहे. तर शर्वरीचे वडील शैलेश वाघ हे एक नामांकित बिल्ङर आहेत आणि तिची आई एक आर्किटेक्ट आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.