खलनायकाची भूमिका गाजवून या सुपरस्टार अभिनेत्यांनी फक्त मराठीतचं नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला डंका वाजवला होता! बाई वाड्यावर याने तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

मराठी चित्रपट सृष्टीही हिंदी सारखी अनेक उतमोत्तम कलाकरांनी भरलेली आहे. इथेही अनेक सुपरस्टार अभिनेते आपल्या कामामुळे खूप प्रसिद्ध आहेत. काम कुठेही करा. कामाच्या आलेखावर त्याचं चांगलं वाईट यश मिळतच. आपण प्रेक्षक वर्ग जास्त करून चित्रपटामधील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या हिरोला ओळखत असतो.

हिरोईन ला ओळखतो. पण त्यांच्याच ताकतीची व्हिलन ची भूमिका साकार करणाऱ्या अभिनेत्याला अभिनेत्रीला आपण जास्त लक्षपूर्वक पाहत नाही. किंवा भविष्यात लक्षात ठेवत नाही. आज या जगात आपल्याला माहितेय की प्रत्येकालाच हिरो व्हायचं आहे. व्हिलन होऊन जीवन संपवायचं नाहीये.

पण कलेच्या क्षेत्रात हिरोला व्हिलन मुळेच न्याय मिळतो. जर व्हिलन नसेल तर हिरोचा काय उपयोग ? त्यामुळे आपल्याला कमी जाणीव असलेल्या पण आपल्या कामाने मराठीत नव्हे तर हिंदीत सुद्धा दणका उडवणाऱ्या काही निवडक प्रसिद्ध व्हिलन चं आयुष्य आज आपण जाणून घेणार आहोत.

See also  अभिनेत्री सोबत इंटिमेट सीन दिल्यावर बॉबी देओलला वडील धर्मेंद्र संतप्त होत म्हणाले, "तू कधी असे काही..."

जे लाखात एक असे कलाकार आहेत. ज्यांना पडद्यावर पाहिलं की चित्रपट पाहिल्याचं सुखं मिळतं. चला तर मग मराठी, हिंदी या रुपेरी पडद्यावर आपली कला गाजवून छाप करणाऱ्या एका एका अभिनेत्याचं आयुष्य जाणुन घेऊयात. त्यांनी अजरामर केलेल्या भूमीकेवर एक नजर मारुयात.

प्रेक्षकांनो तुम्हाला साठ आणि सत्तर दशकापासून मराठीत व्हिलन गिरी करणारा जनार्दन भूतकर उर्फ राजशेखर हा अभिनेता माहित असेल. बाणेदार शरीर, धारधार नजर, व्हिलन ला साजेसं असणारं व्यक्तिमत्व. अश्या अनेक गुणांनी त्याला एक यशस्वी व्हिलन बनवलं.

या गुणी क्लाकराने मधमाशी, कावेबाज आणि मर्दनी अंदाजामुळे आपलं नाव रुपेरी पडद्यावर व्हिलन म्हणून खूप गाजवलं. दरोडेखोर या मराठी चित्रपटात साकारलेली व्हिलन ची भूमिका आजही आपल्या लक्षात असेल. त्यांनी एक दशक अभिनेता म्हणून खूप गाजवलं आहे.

१९६० नंतर मराठी रंगभूमीला आणि चित्रपट सृष्टीला एक हरहुन्नरी अभिनेता मिळाला. ह्या अभिनेत्याने प्रमुख भूमिका, व्हिलन आणि अजून अनेक प्रकारच्या भूमिका तब्बल चाळीस वर्षं साकारून या कलेवर राज्य केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण तो अभिनेता म्हणजे सोनं होता. त्याचं नाव आहे निळू फुले. बाई वाड्यावर या ! ह्या एका वाक्याने तर त्यांना यशाच्या शिखरावर पोहचवलं. आज ते आपल्यात नाहीत.

See also  या 5 अभिनेत्री ग'र्भ'वती असताना देखील करायच्या चित्रपटाचे शूटिंग, 3 नंबरची अभिनेत्री तर होती...

पण त्यांनी साकरलेल्या अनेक व्हिलन च्या भूमिका आपल्याला त्यांच्या असण्याची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. शब्दात व्यक्त करता यायचे नाहीत अश्या प्रकारचे निळूफुले व्हिलन होते. आयत्या बिळावर नागोबा, एक रात्र मंतरलेली सारख्या अनेक चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या पैकी निळू फुले एकमेव अभिनेते आहेत.

आंधळा मागतो एक डोळा, एक दोन तीन, अपराध अश्या दर्जेदार चित्रपटातून आपल्या व्हिलन गिरी अभिनयाला प्रेक्षकांना पाहण्यास भाग पाडणारा अभिनेता होता रमेश देव. उत्कृष्ट सवांद शैली हा प्रकार रमेश देव यांचा उजवा गुण होता. खलनायक खऱ्या रूपाने रुपेरी पडद्यावर साकारून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे.

१९८० आणि ९० च्या दशकात तर खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्याची जशी रांगच लागली होती. विजू खोटे, दीपक शिर्के, सदाशिव अमरापूरकर, सारख्या अनेक अभिनेत्यांनी खलनायक म्हणून प्रेक्षकांनवर राज्य केलं आहे. या सगळ्यांच्या अभिनयातील विविधता तेही वास्तवातील खलनायकी परिस्थितीला धरून करणे यामुळे हे सगळे अभिनेते प्रचंड प्रसिद्ध झाले. यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील रांगडे खलनायक साकारण्यात यश मिळवलं. आज त्यातील काही अभिनेते या जगात नाहीत. पण जे आहेत ते आजही आपलं अमूल्य योगदान देण्याच्या प्रयत्नात आहेत.

See also  एका बस ड्रायव्हरचा मुलगा ते KGF मधील रॉकी भाई, जाणून घ्या सुपरस्टार अभिनेता यशचा थक्क करणारा जीवन प्रवास...

आपल्या सगळ्या मराठी प्रेक्षकांच्या अभिमानाची बाब म्हणजे या सर्व खलनायक अभिनेत्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला सुद्धा आपलं अमुल्य योगदान दिलेलं आहे. त्यांच्या या कलेच्या सेवेकरिता आदर सलाम !..

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment