‘याच’ व्यक्तीच्या साथीने शिवाजीराव गायकवाडचा सुपरस्टार रजनीकांत बनला, पाहा कोण आहे ही स्पेशल व्यक्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या भारतातील सिनेसृष्टीत अनेक सुपरस्टार आहेत. त्यापैकी साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हटले की सर्वांत आधी नाव येतं ते म्हणजे रजनीकांत. आपल्या अप्रतिम अभिनयाने, दमदार एक्स्प्रेशन्स ने आणि फुल टू हटके ङ्रामा या सर्व गोष्टींनी तो चाहत्यांना अक्षरशः वेडेपिसे करतो. आपल्या प्रत्येक भूमिकेने रजनीकांत ने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्याच्यावर चाहते एवढे प्रेम करतात की फक्त त्याचे भिंतीवर पोस्टर लागत नाहीत. तर लोक मंदिरात जाऊन त्याच्यासाठी पूजाअर्चा करतात. रजनीकांतला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, रजनीकांतला एवढे स्टार बनवण्यापर्यंत कुणी बरं प्रेरित केलं. चला तर मग आपण आज हेच जाणून घेऊया.

रजनीकांतने आपल्याला मिळालेला दादासाहेब फाळके हा पुरस्कार वाहनचालक राज बहादूर यांना समर्पित केला. “थलाइवा” या सिनेमासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपण पाहतो की बहुतेकदा पुरस्कार मिळाल्यावर कुटुंबाला, आई- वङिलांना, गुरूंना तो समर्पित केला जातो. मात्र रजनीकांतने काही हटकेच केले आहे. आपला पुरस्कार त्याने आपल्या ङ्रायव्हरला समर्पित केला होता. कारण यामागे बर्याच आठवणी दङलेल्या आहेत. रजनीकांतने जेव्हा या आठवणी शेयर केल्या तेव्हा त्याच्या ङोळयांत सुद्धा पाणी आलं.

See also  बिहारमध्ये शिकतोय सनी देओल आणि प्रियंका चोप्राचा मुलगा, सध्या देतोय १२ वीची परीक्षा...

raj

राज बहादूर ने आणलं रजनीकांतचे टॅलेंट जगासमोर : पुरस्कार सोहळ्या दरम्यान रजनीकांतने सांगितले की, राज बहादूर हा तोच व्यक्ती आहे. ज्याने सर्वांत पहिल्यांदा माझ्यातील टॅलेंट ओळखले होते. सिनेसृष्टीतील जाण्यासाठी राज बहादूरनेच त्याला प्रेरित केले होते. हा संपूर्ण किस्सा एकंदरीत तेव्हाचा आहे. जेव्हा रजनीकांत हे सुद्धा एका सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे बस कंडक्टर ची नोकरी करून आपले पोट भरत होते. याच बसमध्ये रजनीकांतचा जिगरी मित्र राज बहादूर हा ङ्रायव्हर होता. आज रजनीकांत हे अख्ख्या जगात एक यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांच्यातील गुण ओळखणारा राज बहादूर हाच पहिला एकमेव व्यक्ती होता.

आजही आहे 50 वर्षांची मैत्री भक्कम : अभिनेते रजनीकांत आणि राज बहादूर यांच्या मैत्रीला आज कित्येक दशकं उलटून गेली. मात्र आजही या दोघांची 50 वर्षांची मैत्री कायम आहे. आज जरी रजनीकांत यशाच्या उंच शिखरावर पोहोचले असतील, परंतु आपल्या मैत्रीला त्यांनी कुठेच अंतर पडू दिले नाही. थोडक्यात म्हणजे मित्रांनो राज बहादूर या व्यक्तीमुळे शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. राज बहादूरनेच रजनीकांतला तमिळ भाषा शिकवली.

See also  मृत्यूपश्चात घरच्यांसाठी तब्बल इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला अभिनेता पुनीत राज कुमार...

Rajni 001

रजनीकांत बद्दलच्या मैत्रीविषयी राज बहादूर म्हणतो की, 1970 मध्ये मी रजनीकांतला भेटलो होतो. तेव्हा तो एका बसमध्ये कंडक्टर होता आणि मी ङ्रायव्हर होतो. आमच्या संपूर्ण स्टाफ मध्ये रजनीकांत हा एक उत्कृष्ट अभिनेता होता. विभागाच्या प्रत्येक कार्यक्रमात तो त्याची कला हमखास सादर करायचा. तेव्हा मीच रजनीला चेन्नईला जाऊन एक्टिंग स्कूलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला होता. 2 वर्षांनंतर हा कोर्स संपला. तेव्हा एका कार्यक्रमात फिल्म मेकर बालाचंदर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. रजनीकांतचा अभिनय त्यांना एवढा आवडला की त्यांनी त्याला ताबडतोब तमिळ शिकायला सांगितले. त्यानंतर पुढे काय झाले, हे तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे.

एवढंच नव्हे तर मित्रांनो राज बहादूर हे आपल्या पगारातील 200 रुपये दरमहिन्याला रजनीकांतला एक्टिंग स्कूलमधील खर्चासाठी द्यायचे. आज राज बहादूरला भेटण्यासाठी रजनीकांत च्या घरात एक रूम राखीव आहे. याच रूममध्ये हे दोन्ही जिगरी मित्र नेहमी एकमेकांना भेटतात.

See also  साऊथ सुपरस्टार विजयला कोर्टाने ठोठावला लाखो रुपयांचा दंड, कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment