अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पाळतात हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, हि अभिनेत्री तर काजाळ लावल्याशिवाय करत नाही हे काम..

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

तुमच्या आमच्या सारखेच आज बॉलीवूड मधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी अभिनेते अभिनेत्री हे अंधश्रद्धाला पुजत आहेत. त्यांना सुद्धा असं वाटतं की या मार्गानेच यश आणि आरोग्य व्यवस्थित निरोगी ठेवू शकतो. अमिताभ बच्चन, अजय देवगण, शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अजून कितीतरी सेलिब्रिटी आज अंधश्रद्धेवर खूप विश्वास ठेवतात. तर चला मग ते कश्या प्रकारे अंधश्रद्धाला स्वतःच्या आयुष्यात बळी पडतात ते सविस्तर जाणून घेऊयात.

आज नावाजेलेले कलाकार, उद्योजक किंवा राजकारणी हे स्वतःला कितीही बुद्धिमान समजत असले ती; पण कुठेतरी एखाद्या गोष्टीबद्दल अंधश्रद्धा ही बाळगतातच. जेव्हा आपण विज्ञान, सर्जनशीलता व तर्क बाजूला ठेवतो तेव्हा मनुष्य पूर्णपणे अंधश्रद्धेवर अवलंबून असतो. बॉलीवूड मधील लोकप्रिय कलाकार आज त्यांच्या यशस्वी नशिबासाठी राशीची अंगठी, दागिने हे भाग्यवान समजून आकर्षण परिधान करून फिरत असतात.

Advertisement

अमिताभ बच्चन : मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी स्वतः त्यांच्या अंधश्रद्धेबद्दल सांगितले आहे की ते क्रिकेट खेळाचे खूप प्रेमी आहेत; पण ते कधीही थेट सामने बघत नाहीत, कारण त्यांना वाटते की जर त्यांनी सामना पाहिला तर जिंकत आलेला भारताच्या ढसाढसा विकेट पडतील आणि भारत सामना गमावेल. बरं या अंधश्रद्धेसोबत बच्चन साहेब एक नीलमणी अंगठी देखील घालतात, ज्याबद्दल ते मानतात की ती घातल्यानंतरच त्यांच्या आयुष्यातून वाईट वेळ गेली आणि त्याचे नशीब चमकले.

See also  अंडरवर्ल्ड डॉनसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडली गेली होती ही सुंदर बॉलीवूड अभिनेत्री!

शाहरुख खान : बॉलिवूडचा बादशाह लोकप्रिय करोडो रुपयांचा मालक अभिनेता शाहरुख खानचा 555 व्या क्रमांकावर खूप विश्वास आहे. या नंबरवर किती विश्वास आहे हे त्यांच्या सर्व वाहनांच्या नंबरप्लेटवर स्पष्ट दिसून येतं. चेन्नई एक्सप्रेसच्या पोस्टरसाठी त्यांनी जी बाईक चालवली होती त्या नंबर प्लेटवर सुद्धा 555 नंबर होता.

Advertisement

शिल्पा शेट्टी : जेव्हाही शिल्पा शेट्टीची टीम राजस्थान रॉयल्स मैदानात क्रिकेट खेळत असते, तेव्हा ती नेहमी दोन घड्याळे घालताना दिसत असते. आइपिएल मध्ये आपण अनेक वेळा पाहिलं असेल. बरं एवढच नाही तर ही गोष्ट वाचून हसायला येईल किंवा फालतू वाटेल; पण सामन्यादरम्यान ती ज्या पद्धतीने बसते त्याबद्दल सुद्धा अंधश्रद्धा पाळते. म्हणजे बघा जेव्हा विरोधी संघ फलंदाजी करतो, तेव्हा ती तिचे पाय पसरून बसते तर तिचा संघ खेळायला लागला की पाय आखडून बसते.

See also  बॉलिवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री चक्क करत आहे शेती, कारण ऐकून थक्क व्हाल!

अक्षय कुमार : बॉलिवूडचा अक्की अर्थात लोकप्रिय खिलाडी नंबर वन अभिनेते अक्षय कुमार हे एक अतिशय व्यावहारिक व्यक्ती म्हणून इंडस्ट्री मध्ये, चाहत्यांनमध्ये आणि सर्व प्रेक्षकांमध्ये वावरताना दिसून येतात; परंतु सत्य हे आहे की ते देखील अशा अंधश्रद्धेवर विश्वास खूप ठेवतात. खिलाडी अक्षय कुमार यांना वाटते की त्यांची प्रीमीयर ला असलेली उपस्थिती स्वतःच्याच चित्रपटाच्या बॉक्स-ऑफिस कलेक्शनसाठी चांगली कामगिरी ठरणार नाही. म्हणूनच अक्षय कुमार हे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच परदेशात जातात.

Advertisement

विद्या बालन : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन यांच्या सुद्धा विचित्र अंधश्रद्धा आहेत ज्या त्या धार्मिकदृष्ट्या पाळतात. विद्या बालन या काजल लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. काजल लावल्याने सर्व कामे होतात आणि कुणाची नजर लागत नाही असा त्यांचा विश्वास आहे.

See also  बॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर

अजय देवगण : त्याचबरोबर भुज अभिनेता अजय देवगण हे देखील एका अंधश्रद्धेवर विश्वास ठेवताना दिसून येतात. अजय देवगन यांच्या कारकिर्दीत अनेक चढ -उतार आलेले आहेत, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या आडनावातून ‘अ’ अक्षर काढून टाकलेले आहे. त्याचबरोबर त्यांचा असा विश्वास आहे की असे केल्यानेच त्यांना यश मिळाले आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close