वडिलांच्या संपत्तीत मुलींना मिळणार आता सामान वाटा, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

दिल्या घरी सुखी रहा, मुलगी म्हणजे कितीही झालं तरी शेवटी परक्याचं धन असतं ! या उक्तीप्रमाणे लग्न करून तिला वाटं लावलं जातं. त्यानंतर मुलाला वडिलांची प्रॉपर्टी दिली जाते.

जिथं जन्म घेतला तिथलं काहीच मुलीच्या पदरात पडत नाही. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते म्हणून तिचा यावर काही हक नाही असा अनेकांचा जुनं समज आहे. पण या समजावर आता सुप्रीम कोर्टाने उडी घेतली आहे.

सुप्रीम कोर्टाने काल त्यावर निकाल दिला आहे की आता इथून पुढे मुगळी सुद्धा घरातील संपत्तीच्या हिस्सेची वाटेकरी होणार आहे. तिला तिचा वाटा मिळणार आहे. जो पिढीजात चालत आलेल्या जुन्या परंपरेमुळे मिळत नव्हता. ती परंपरा ही आता सुप्रीम कोर्टाने मोडीत काढलेली आहे.

अनेक दिवसांपासून यावर निकाल लागत नव्हता वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यात आज मुली जरी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ्या राहत असल्या, शिक्षण घेत असल्या तरी त्या वाटा मागायला कचरतात. घरी बोलायाचं धाडस त्या दाखवत नाहीत. कारण एकच आहे की चालत आलेली परंपरा त्याला जवाबदार आहे.

See also  ‘त्या’ 12 भाजप आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दाखल केल्या 4 याचिका

एक साधा प्रश्न आहे की मुलगी ही सुद्धा एक बापाची जवाबदारी आहे ना ? त्याचं घरात जन्मली नं ती ? मग तिच्यात आणि मुळात भेदभाव का ? तिला हक्क का मिळत नाही ? पण याचा कसलाच विचार न करता मुलीचं लग्न लावून देऊन तिच्या पदरी बाप , भाऊ काहीच देत नव्हता. पण आता नियम बदलले आहेत. आता मुलगी सुद्धा आपला हक्क सांगू शकते. तिला तिचा अधिकार कालच्या आदेशाने मिळाला आहे.

मुलगी म्हणजे परक्याचं या परंपरेवर कोर्टाने घाव घातला आहे. परंपरा मोडीत काढलेली आहे. आता फक्त समाजाला त्यावर घाव घालून परंपरा मोडीत काढावी लागणार आहे. काही वर्षांपूर्वी पासून या कायद्यात बदल होण्यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न चालू आहेत.

See also  "अरे देवा, ही तर नाइटी घालून आली.." करीना कपूरला पाहून चाहत्यांनी केले तिला ट्रोल...

२००५ मध्ये या कायद्यात सुधारणा झाली होती. त्यात वडिलांच्या मालकी हक्कावर मुलींचा तेवढाच अधिकार असेल जेवढा मुलांचा असणार आहे. पण त्यानंतर त्यावर योग्य अमलबजावणी झाली नाही. त्यामुळे त्या संबंधित काल सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुलीला तिचा हक्क मिळणार असा निकाल देऊन आदेश लागू केला.

या आदेशानुसार आता मुलगी न घाबरता कायद्याने आपला हक्क मांडू शकते. पण तिच्यावर ही वेळ आता वडील आणि भाऊंनी येऊन देऊ नये. कारण तिला आता कायद्याचा अधिकार मिळालेला आहे. देशभरात महिलांच्या कडुन सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचं कौतुक करण्यात आलेलं आहे.

मुलीला आज पर्यंत मुलापेक्षा खूप तुलनेत लेखलं जातं ही आपल्या समाजाला लागलेली बुरसटलेली विचारसरणी आहे. त्यावर आता कायदा हाच एकमेव उपाय आहे. आता इथून पुढे अनेक महिलांना न्याय मिळेल. ज्या आईच्या पोटी सगळे जन्म घेतात पुढं तीच आई , मुलगी नको म्हणतात ! हे दुर्दैव.

See also  पैसे काढण्यासाठी तरुणाकडे मागितली मदत, त्यानंतर महिलेसोबत असे काही घडले की...

आता यापुढे प्रत्येक मुलगी जर तिला वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा हवं असेल तर डावा करू शकते. जेव्हा ही गोष्ट वाऱ्याच्या वेगासारखी समाजात सोशल मिडीयाच्या माध्यमांतून पोहचली तेव्हा अनेक मेम्स सुद्धा व्हायरल झाले.

त्यात विनोदांचा भाग म्हणजे समजा जर एखाद्या मामाकडे जर मुलगी असेल आणि तो द्यायला तयार नसेल त्यात इकडं भाच्याला पोरगी मिळत नसेल तर आईच्या माहेरच्या संपत्ती दाव्यावरून तरी मामला मुलगी द्यायला भाग पडावं लागेल. हे ही तितकच खरं आहे चांगल्या वाईट मार्गाने दावा करणं सुरु होईल. पण एक मात्र नक्की की कायद्यात झालेला बदल खूप महत्वाचा आहे. जो सध्याच्या काळात खूप गरजेचा होता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment