सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या मांडीवर बसलेल्या मुलाचे कार्य वाचून तुम्हाला अभिमान वाटेल !

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्याच्या परिस्थितीत माणूस माणसापासून लांब चाललाय. दुरावा वाढलाय. अहंकार वृत्ती प्रामाणिक पणावर हावी होत आहे. नाती बिघडत आहेत. पण जग एवढं विस्कळीत असताना कुणाचाच कुणावर विश्वास राहिलेला नसताना एखादी चांगली गोष्ट सुद्धा आपल्यावर खूप प्रभाव पाडु शकते. माणुसकी हरवत चाललेल्या जीवनात अशीच एक सकारात्मक विचारांना पोसणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. चेन्नई येथील एका लहान मुलाला रस्त्यात जाताना पन्नास हजार रुपयांची रोकड सापडली. हे ऐकून प्रत्येकाला वाटलं असेल की त्या मुलाने ते पैसे घेऊन खूप मजा केली असेल. श्रीमंती कमावली असेल. आयुष्य बदलवून टाकलं असेल. पण नाही असं काहीच घडलं नाही.

जेव्हा त्याच्या समोर पन्नास हजरांची रोकड रस्त्यात दिसली त्यानंतर त्याला खूप आनंद झाला. जो कुणालाही होऊ शकतो. पण त्यानंतर त्याला वाटलं की हे कुणाचेही गरिबाचे असू शकतात. किंवा ज्याचे असतील त्याची काही मोठी अडचण असेल. किंवा असे अनेक अडचणी मुळे त्याला पैश्यांची गरज असेल. त्यामुळे ज्याचे असतील त्याला गेले पाहिजे. जर आपण आपल्याकडे ठेवले तर हरामाचे होतील. तो तडक पोलीस स्टेशन मध्ये गेला. पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगून पन्नास हजार त्यांच्या हवाली केले.

See also  पंजाब मधील त्या आजीमुळे अभिनेत्री कंगना राणौत अ'ड'कली खूपच मोठ्या सं'क'टात, ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

 

View this post on Instagram

 

रजनीकांतच्या मांडीवर बसलेल्या या मुलाचे नाव आहे महंमद युसुफ. या मुलाला रस्त्यावर ५० हजार रुपये सापडले, ते त्याने तडक पोलीस स्टेशनला नेऊन जमा केले. मुलाचा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी त्याला काय बक्षीस देऊ विचारले. त्यावर मुलाने आपल्याला रजनीकांतला भेटायची इच्छा असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची इच्छा पूर्ण केली. . . . #rajnikanth #rajnikant #viral #viralpost #goodpost #rajnikanth #news #milokmat #lokmat

A post shared by Lokmat (@milokmat) on

पोलिसांना त्याचा प्रचंड अभिमान आणि कौतुक वाटलं. त्याचं निस्वार्थी मन पाहून पोलिसांनी त्याला बक्षीस द्यायचं ठरवलं. त्यांनी तुला काय पाहिजे असं विचारलं ? मला जे पाहिजे ते तुम्ही देतान ? हो मग तू सांग. मला ना सुपरस्टार रजनीकांत यांना भेटायचं आहे. त्याचं उत्तर ऐकून पोलीस चकीत झाले. त्याला पैसे लागत नव्हते. तर त्याला त्याच्या आवडत्या हिरोला भेटायचं होतं. पोलिसांनी त्याला भेटून द्यायचं ठरवलं.

See also  'देव माणूस' मालिका सत्य घटनेवर आधारित आहे का? नेमका कोण होता हा न-रा-ध-म डॉक्टर? याची सत्य घटना जाणून थक्क व्हाल.

रजनीकांत ला ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा तोही या मुलाला भेटायला उत्सुक झाला. पोलिसांनी त्या मुलाला शेवटी रजनीकांत ला भेटवलच. जेव्हा रजनीकांत यांनी त्याला मांडीवर बसवलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.या मुलाचं नाव महंमद युसूफ आहे. त्याची परिस्थिती खुप हलाखीची आहे. त्याचं जीवन त्या पैश्यांनी बदलू शकत होतं; पण त्याच्या कडची इमानदारी खरच खुप काही शिकायला लावणारी आहे.

Advertisement

104132649 1066769943706950 7664983300772900996 n

त्याला स्वतःच्या कष्टावर व त्यातून मिळालेल्या फळावर विश्वास होता. खरचं अशी मोठ्या मनाची माणसं असणं खुप गरजेचं आहे. ही गोष्ट जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हापासून महंमद युसूफ चं सर्वत्र खुप कौतुक होत आहे. रजनीकांत चं आयुष्य ही खूप गरीबीतून पुढं आलेलं आहे. त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टींची जाण आहे. त्यांनीही खूप मोठं मन दाखवून एवढ्याश्या लहान मुलाला भेट दिली. महंमद युसूफ कडे या वयात इतके चांगले विचार आहेत तर पुढे मोठेपणी नक्कीच खरा व्यक्ती म्हणून नाव कमवेल. महंमद युसूफ च्या इमानदारीला सलाम !…

See also  ना परीक्षा, ना तणाव तरीही दहावीचे ‘एवढे’ विद्यार्थी’ नापास, ‘एवढ्या’ शाळांचा शून्य टक्के निकाल , जाणून घ्या दहावच्या निकालाची आकडेवारी

Leave a Comment

close