‘जय मल्हार’ मधील म्हाळसा फेम अभिनेत्री आता दिसते इतकी ग्लॅमरस, खूपच मोहक आहे तिचा हा नवा अंदाज…
“जय मल्हार” या झी मराठी वाहिनीवरील मालिकेने महाराष्ट्राचे कुलदैवत भगवान श्री मल्हार मार्तंड यांच्या जीवनाची प्रचिती करून दिली. म्हाळसा व बाणू अशा मार्तंड खंडोबाच्या दोन पत्नी होत्या. मात्र देव असूनही त्यांनी दोन लग्न का व कशासाठी केली. हे बहुतांश लोकांना तर ठाऊक नव्हते. मात्र “जय मल्हार” या मालिकेने फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर सात समुद्रापार देवाची महती प्रसिद्धी केली. अर्थातच त्या मालिकेतील कलाकारांच्या साथीमुळे हे शक्य झाले. त्यातीलच एक कलाकार सुरभी हांडे.
अभिनेत्री सुरभी हांडे हिने “जय मल्हार” या पौराणिक मालिकेत देव मार्तंड खंडोबाच्या पहिल्या पत्नी देवी ‘म्हाळसा’ यांची प्रमुख भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत सुरभी आता म्हाळसा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
त्यानंतर सुरभी हांडेने “लक्ष्मी सदैव मंगलम” या मालिकेत देखील उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे. तसेच “अगं बाई अरेच्चा 2” या चित्रपटात देखील ती छोटीशी भूमिका सादर करताना दिसली. सुरभी सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. त्यामुळे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात सदैव असते.
आपले नवनवीन लेटेस्ट फोटोज् आणि व्हिडिओज ती सोशल मीडियावर शेयर करत असते. अभिनेत्री सुरभी हांडे हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्ही क्वचित एखादी नजर टाकली, तर ही देव खंडोबांची म्हाळसा तुम्हांला भलतीच ग्लॅमरस लुक मध्ये पाहायला मिळेल. तिचे फोटोज् पाहून काळजाचे अक्षरशः पाणी होईल, अशा तिच्या कातिल अदा आहेत. आपले प्रत्येक फोटोशूट सुरभी इन्स्टाग्रामवर शेयर करत असते.
सुरभी हांडे हिने फेब्रुवारी 2019 मध्ये जळगावच्या दुर्गेश कुलकर्णी सोबत विवाह केला. तर सुरभी व दुर्गेश हे लग्नापूर्वी एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. त्यानंतर त्यांच्या या निरागस मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, हे त्यांचे त्यांना देखील कळले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या नात्याला घरच्यांची देखील परवानगी मिळाली. त्यानंतर मग ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी एकमेकांसोबत साखरपुडा केला.
या ब्यूटीफुल कपलच्या साखरपुड्याचे फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले होते. पुण्यातील प्रसिद्ध ढेपेवाङा येथे सुरभी व दुर्गेश यांचे लग्न झाले. कारण हा वाडा म्हणजे पारंपरिक वारसा जपणारा आहे. म्हणून त्यांनी येथे सप्तपदी घेण्याचे ठरवले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.