तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बधाई हो, बालिका वधूच्या या जेष्ठ अभिनेत्रीची मरण्याआधी परिस्थिती झाली होती अशी…
आज हिंदी चित्रपट, मालिका आणि नाट्य सृष्टी मध्ये खूप शोककळा पसरली. कारण एक उत्तम अशी जेष्ठ अभिनेत्री आपल्याला सोडून गेली. हृदय वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने. त्या अभिनेत्री चं नाव म्हणजे सुरेखा सिक्री ( surekha sikri ). होय, बालिका वधू किंवा बधाई हो मधील लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री.
पण त्यांच्या विषयी काही गोष्टी माहीत आहेत का आपल्याला ? त्यांना खरं तर अभिनेत्री न होता काय व्हायचं होतं माहिती आहे का ? जाणून घेऊ सविस्तर.
‘बधाई हो’ चित्रपटातून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचं आज १६ जुलै २०२१ रोजी हृ’द’य’वि’का’राच्या झटक्याने नि’ध’न झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘बालिका वधू’ या छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेल्या मालिकेतून सुरेखा यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
बाहेरून कठोर पण मनाने प्रेमळ असणाऱ्या या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आपल्या अभिनयाने सुरेखा त्यांच्या सहकलाकारांवरही भारी पडत. परंतु, अभिनयासाठी फिल्मफेअर मिळवणाऱ्या सुरेखा यांचं स्वप्न तर एक पत्रकार होण्याचं होतं.
१९ एप्रिल १९४५ साली दिल्लीमध्ये जन्मलेल्या सुरेखा पत्रकार किंवा लेखिका बनू इच्छित होत्या. परंतु, नियतीने मात्र त्यांचे रस्ते आधीपासूनच ठरवले होते. सुरेखा तेव्हा अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होत्या. एकेदिवशी त्यांच्या कॉलेजमध्ये अब्राहम अलकाजी आले होते.
त्यांनी सादर केलेलं नाटक पाहून सुरेखा खूप प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश घेण्याचं ठरवलं. त्या एनएसडीचा फॉर्मदेखील घेऊन आल्या होत्या. परंतु, अनेक दिवस तो फॉर्म त्या भरू शकल्या नव्हत्या. सुरेखा यांच्या आईने त्यांना फॉर्म भरण्याचा सल्ला दिला. आईचं म्हणणं मान्य करत त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना कॉलेजमध्ये प्रवेशदेखील मिळाला.
त्यानंतर सुरेखा यांनी अनेक वर्ष नाटकांत काम केलं. छोट्या पडद्यावर त्यांनी ‘बालिका वधु’, ‘बनेगी अपनी बात’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘एक था राजा एक थी रानी’, ‘केसर’, ‘कभी कभी’ आणि ‘जस्ट मोहब्बत’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. परंतु, त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘बालिका वधू’ मालिकेतील दादीसा या पात्रामुळे.
सुरेखा यांनी चित्रपटांमध्येही नाव कमावलं. ‘नसीब’, ‘सरदारी बेगम’, ‘दिल्लगी’, ‘नजर’, ‘जुबेदा’, ‘रेन कोट’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘हमको दीवाना कर गए’, आणि ‘घोस्ट स्टोरीज’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. ‘बधाई हो’ मधील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.
अभिनेत्री सुरेखा दीदी यांची परिस्थिती मात्र कुणालाही माहीत नसेल. आपल्याला वाटतं की सगळेच फिल्मी कलाकार करोडो मध्ये जगतात. तर तस नाही. आज भावपुर्ण श्रद्धांजली म्हणून आयुष्यमान खुराणा ने एक पोस्ट केली.
त्यात असं लिहिलं होतं की बधाई होच्या प्रीमियर च्या वेळी त्या रिक्षाने घरी जात होत्या तर मी ( आयुष्यमान ) ने त्यांना म्हणलं की माझ्या गाडीत चला. तुम्ही तर फिल्म च्या स्टार आहात. तेव्हा त्या म्हणाल्या की फक्त माझ्यासाठी जास्त कामे मिळतील याची प्रार्थना कर. बघा म्हणजे किती हलाखीच्या परिस्थिती जगत होत्या. सलाम त्यांच्या कामाला स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.