हा फोटोतील लहान मुलगा आज आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, अभिनेत्याचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही…

कधी काय व्हायरल होईल याचं काहीच भरवसा राहिलेला नाही आहे. म्हणजे बघा सोशल मीडियावर अत्यंत सामान्य असलेली गोष्ट सुद्धा खूप व्हायरल होते. बर सध्या तर एका सुपरस्टार चा लहानपणी चा फोटो व्हायरल होत आहे. कलाकार म्हणलं की ग्लॅमरस हि आल्या आणि त्यासोबत त्यांची सोशल मीडियावर असलेला चाहत्यांचा गराडा आलाच. तर झालं असं की मराठी मधील एक चॉकलेट बॉय म्हणून परिचित असलेल्या अभिनेत्याचा लहानपणी चा खूप गोड गोंडस फोटो व्हायरल आणि चर्चेत येत आहे.

swapnil joshi

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो अभिनेता नेमका कोण ? तर त्याचं नाव आहे स्वप्नील जोशी. होय ज्याच्या अभिनयावर अनेक जण फिदा आहेत. चल तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

सध्या सोशल मीडियावर एका लहान गोंडस मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कमरेवर हात ठेवून निरागसपणे बघत असलेलला हा मुलगा कोण आहे? ओळखला का तुम्ही? हा गोंडस मुलगा आहे. मराठीतला लाडका अभिनेता, चॉकलेट हिरो अशी बिरुदं मिळालेला सुपरस्टार स्वप्नील जोशी आहे हा.नुकताच स्वप्नीलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या बालपणीचा हा फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आणि त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

READ  फक्त 50 रुपयांत लग्नं केले होते या मराठमोळ्या आदर्श जोडीने, जाणून घ्या महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींची फिल्मी प्रेमकथा...

swapnil joshi photo

कारण स्वप्नील जोशी हा खूप लोकप्रिय असा अभिनेता आहे. त्याचं सौन्दर्य हे खूप निरागस आहे. सध्या तो चला हवा येऊ द्या मध्ये असतो.
आणि त्याने आजवर वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. ज्यावेळी त्याने कामाची सुरुवात केली त्यावेळी त्याने हिंदीत ही काम केलेले आहे.

स्वप्नील हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि नावाजलेला अभिनेता समजला जातो. त्याचबरोबर स्वप्नीलला एक रोमांटिक अभिनेता समजलं जातं. अनेक तरुणी स्वप्नीलवर फिदा आहेत. स्वप्नीलचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. अशा आपल्या लाडक्या अभिनेत्याचा हा बालपणीचा देखणा आणि निरागस फोटो पाहून चाहते त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत.

66392073

स्वप्नील जोशीचा जन्म मुंबईमध्येच झाला आहे. त्याने आपले शालेय शिक्षणसुद्धा मुंबईमधील एका शाळेत घेतले आहे. त्यांनतर स्वपिलने आपले महाविद्यालयीन शिक्षण कॉमर्समधून घेतले आहे. स्वप्नीलने 2005 मध्ये दंतवैद्य असलेल्या अपर्णा या मुलीशी लग्नं देखील केलं होतं. मात्र ते फार काळ टिकू शकलं नाही. त्यांनतर स्वप्नीलने लीना हिच्याशी दुसरं लग्न केलं.

READ  बिगबॉस फेम ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

कारण शेवटी कलाकार म्हणलं की य गोष्टी आल्याचं ज्यामुळे नाती एकतर आयुष्य भर टिकतात नाहीतर तुटतात. म्हणजे खरं प्रेम लॉंग टाईम असतं तर खोटं हे नेहमी खोटं राहतं. तर त्याचा पहिला घटस्फोट झाल्यावर त्याने दुसरं लग्न केलं. जे की आता खूप उत्तम चालू आहे. आणि त्यातील कुटुंब ही चांगलं आहे.

ht pune 38eda2f4 f7b5 11e8 b0ae a79201e85078

स्वप्नीलच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अगदी बालवयात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. स्वप्नीलने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ‘उत्तर रामायण’ या टीव्ही वरील मालिकेत रामपुत्र ‘कुश’ ची भूमिका साकारली होती. त्यामुळे स्वप्नील हा बालपणी पासूनच अभिनयाचा वसा चालवत आहे. त्यानंतर स्वप्नीलने ‘श्रीकृष्ण’ या हिंदी मालिकेमध्ये भगवान ‘श्रीकृष्णाची’ भूमिकादेखील साकारली होती. स्वप्नीलने मराठी चित्रपट सृष्टीत अनेक सुप्रसिद्ध चित्रपट केले आहेत. त्यानंतर मालिका, निवेदक, अनेक कार्यक्रमांत परीक्षक म्हणूनही त्यानं काम केलं आहे.

त्याचे काही चित्रपट तर एवढे हिट झालेले आहेत की आजही ते आवर्जून पाहिले जातात. कारण त्यात स्वप्नील ने लाजवाब असं काम केलेलं आहे. त्यात नेमकं कोणते चित्रपट येतात ? तर चला खाली जाणून घेऊयात. की कोणते असे मराठी चित्रपट जे सुपर डुपर हिट झालेले आहेत.

READ  'माझ्या नवर्‍याची बायको' मालिकेतील राधिका अर्थात अनिता दातेची प्रेम कहाणी ऐकून थक्क व्हाल!

Dm3eQFsW0AEn0ao

मराठी चित्रपटांत सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या अभिनेत्रींसोबत त्याची जोडी खास पसंत केली जाते. सई सोबत दुनियादारी, प्यारवाली लवस्टोरी, या चित्रपटांतून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तर मुक्ता सोबत मुंबई -पुणे-मुंबई चित्रपटांत तर प्रेक्षकांनी अक्षरशः या जोडीला डोक्यावर घेतलं. त्यानंतर या चित्रपटाचे 2 भाग सुद्धा तयार करण्यात आले. अशाप्रकारे अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या या अभिनेत्याच्या बालपणीच्या या गोंडसं फोटोला देखील तितकचं प्रेम मिळत आहे.

तर अश्या चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीला त्याच्या पुढील वाटचाली करिता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. हा चॉकलेट बॉय वयाच्या चाळीशी कडे गेला तरी अजूनही तेवढाच यंग आहे. हेच त्याच्या फिटनेस चं यश आहे. जेकी इतर अनेक कलाकार यांना हवं असूनही मिळत नाही.

Leave a Comment