“रणवीरच्या नादी लागू नकोस रे भावा” स्वप्नील जोशी या लुकमुळे झाला ट्रो’ल, कमेंट्स वाचून पोट धरून हसाल…
मित्रांनो कलाकार बॉलीवुड इंडस्ट्रीमधील असो किंवा मग आपल्या मराठी सिनेसृष्टीतील असो… ट्रोलिंगचा सामना तर प्रत्येकाला करावा लागतोच. नुकताच आपला मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता स्वप्निल जोशी याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. परंतु स्वप्निल मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. म्हणजेच थोडक्यात तो आपल्या अंतरंगी लुकमुळे नेहमीच चर्चेत येत असतो.
मात्र यावेळी त्याच्या फोटोजला आलेल्या कमेंट्स पाहून चक्क तुम्हांला सुद्धा हसू आवरणार नाही. अलीकडेच स्वप्निलने इन्स्टाग्रामवर स्वतःचे दोन फोटोज् शेयर केले आहेत. यामध्ये चक्क स्वप्निल दाढी मध्ये दिसत आहे. “आय सी मायसेल्फ अॅज सेक्सी” हे कॅप्शन देत स्वप्निलने हे फोटोज् शेयर केले आहेत. इतकंच नव्हे तर या फोटोज् वर चाहत्यांच्या अफलातुन कमेंट्सचा पाऊस देखील पडला आहे. बहुतेकांना तर स्वप्निलचे हे फोटोज् पाहून बॉलीवुडच्या रणवीर सिंहची आठवण झाली आहे. मग काय सर्वांनीच एकापेक्षा एक सरस अशा कमेंट्स दिल्या आहेत.
स्वप्निल जोशीला त्याच्या फोटोवर युजर्सने “रणवीर च्या नादी लागू नकोस रे भावा”, अशी कमेंट सुद्धा केली आहे. एका युजरने तर “अरे हे धोतर आहे की सदरा?” अशी कमेंट केली आहे. “तू आता मराठीतील रणवीर बनतोस का?” असे देखील एका युजरने म्हटले आहे. एवढंच नव्हे तर एका युजरने तर “पेंटींग च्या कामाचा किती रेट लावता हो तुम्ही” असे विचारत स्वप्निलच्या दिसण्याची अक्षरशः खिल्ली उडवली आहे. त्याचबरोबर एका युजरने तर “स्वप्निल तू देवदास नाही… तर रोमॅन्टिक हिरो आहेस. त्यामुळे मला तुझा हा ङ्रेस अजिबात आवडत नाही”, या आशयाची कमेंट केली आहे.
अभिनेता स्वप्निल जोशी याने आपल्या फेसबुक पेजवर सुद्धा या नवीन लुकचे फोटोज् शेयर केले आहेत. यावरील कमेंट्स वाचून तर खरंच तुम्ही पोट धरून भरपूर हसाल, एवढ्या खतरनाक ह्या कमेंट्स आहेत. कांगारू सारखं लेकरू झोळीत ठेवता येईल, ओटी भरून घ्या हो सर…हा तर दीपिकाचा ङ्रेस दिसतो, रणवीर सिंह तुम्हांला चावला असे वाटतं..अशा प्रकारच्या मजेशीर कमेंट्स युजर्सने केल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच स्वप्निलने असाच एक फाटकातुटका ङ्रेस घालून फोटो पोस्ट केला होता. त्यावर सुद्धा लोक भरपूर हसले होते आणि म्हातारीचा झगा घालून कुठे फिरतोस, अशी कमेंट सुद्धा त्याच्या फोटोवर केली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.