समलैंगिक नव्हे तर थेट चक्क ट्रान्सवुमनच झाला हा मराठी फॅशन डिझायनर, नवीन लुक मध्ये असा दिसतोय…
फॅशन जगतातील नवनवीन घडामोडी आम्ही नेहमीच आपल्या समोर सादर करत असतो. परंतु फॅशनच्या जगाशी आणि त्यातही मराठी माणसाशी निगडित असलेली ही बातमी खूपच हटके वाटली, म्हणून आमच्या वाचकांच्या महितीस्तव देत आहोत.
प्रथम वनिता खरातचे न्यू’ड फोटोशूट आणि आता या मराठी फॅशन डिझायनरने ट्रान्सवुमन बनून स्वतःला स्त्री मध्ये रूपांतरित करून घेतल्याची ही बातमी. मराठी तरुण पिढीला नेमके यातून काय संदेश द्यायचा आहे किंवा ते काय सिद्ध करू इच्छित आहेत, याबाबत आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.
तर बातमी अशी आहे की, पूर्वीच्या स्वप्निल शिंदेची आता चक्क झालीय ‘सायशा’. प्रसिद्ध मराठी फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे याने आपण स्वतःला ट्रान्सवुमन म्हणजे पुरुषातून कायमस्वरूपी स्त्रीमध्ये रूपांतरित केल्याचा खुलासा केला आहे.
यामुळे अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी तिचे कौतुक केले आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेने नव्या वर्षात त्याचं नवं रुप आणि नवं अस्तित्व लोकांसमोर आणलंय. स्वप्निलने ट्रान्सवुमन झाल्याचा खुलासा करत सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. स्वप्निल शिंदेची आता सायशा शिंदे झाली आहे. त्याच्या फोटोवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होत असून अनेक बॉलिवूड कलाकारांनीही त्याला साथ दिली आहे.
सध्या नवीन फोटोंमध्ये सायशाचा लूक पाहायला मिळतोय. या फोटोंसोबतच सायशाने एक पोस्ट लिहीत ट्रान्सवुमन झाल्याबाबत खुलासा केला आहे. लहानपणी कशाप्रकारे स्वप्निलला एकटेपणा, मनाचा गोंधळ आणि लोकांच्या टीकांचा सामना करावा लागला याबाबत तिने या पोस्टमध्ये लिहिलं.
‘शाळा आणि कॉलेजमध्ये जेव्हा सगळी मुलं मला माझ्या वागण्यावरून टी’का करत होते तेव्हा माझ्या मनावर खूप वा’र झाले. जे अस्तित्व माझं नाही ते जगताना मला गु’द’म’र’ल्या’सारखं होत होतं.
वयाच्या विसाव्या वर्षी NIFT दरम्यान मी माझं सत्य स्वीकारण्याचं धाडस केलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मी मुक्त झाले. पुरुषांकडे आकर्षित होत असल्याने मी समलैंगिक आहे असं सुरुवातीला मला वाटलं. पण सहा वर्षांपूर्वी मी स्वत: पूर्णपणे स्वीकारलं आणि आता मी समलैंगिक नाही तर ट्रा’न्स’वु’म’न आहे’, असं सायशाने लिहिलं.
सायशाच्या या पोस्टवर अदिती राव हैदरी, सनी लिओनी, श्रुती हासन, सई ताम्हणकर यांसारख्या फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला साथ दिली आहे. सायशा ऊर्फ स्वप्निलने शिंदेने आतापर्यंत करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, सनी लिओनी, कियारा अडवाणी, कतरिना कैफ यांसारख्या सेलिब्रिटींसोबत फॅशन डिझाइनर म्हणून काम केलं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.