येसूबाईंनी जिंकली तमाम महाराष्ट्रीयांची मने! प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या…

“स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेने तब्बल दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आणि नुकतीच मालिका अंतीम टप्प्यात आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांच्या यथोचीत भूमिका त्या त्या कलाकाराने साकारल्या. त्यातल्याही कवी कलश यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकरवी संभाजी राजांच्या भूमिकेनंतर पसंती मिळालीच. पण “महाराणी येसूबाई” साकारलेल्या प्राजक्ता गायकवाडने तमाम महाराष्ट्रीयांचीच मने जिंकली आहेत.

सुरूवातीच्या काळात अगदी ही अभिनेत्री या जबाबदारीच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल का? असे बरेचसे प्रश्न समोर उभे राहिले होते. परंतु याआधी “नांदा सोख्य भरे” मधील सायली हे पात्र साकारलेल्या प्राजक्ता गायकवाडने सर्वांनाच आपल्या भुमिकेतून दाखवून दिले की, तिची येसूबाईंसाठीची निवड यथोचीत अगदी योग्य होती.तर अशा या मालिकेतील पडद्यावरच्या येसूबाईंनी प्रेक्षकांची मनं अगदी सहजरित्या अभिनयाने जिंकून घेतली.

गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनात एका प्रकारचं खास स्थान व अदब मिळवली आहे. मग ते अमोल कोल्हे यांनी साकारलेले “संभाजी महाराज” असो किंवा प्राजक्ता गायकवाड यांनी साकारलेल्या येसूबाई असो. सर्व कलाकाराना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. प्राजक्ताला नृत्याची आवड आहे.

तीने नवरात्रीत भरतनाट्यम प्रकार सादर करून देवीची नऊ रूपही साकारली होती. प्राजक्ता गायकवाडचा जन्म मूळ पुण्यातलाच. याच मालिकेत येसूबाई मोहिमेवर निघाल्याचा प्रसंग जेव्हा चित्रित केला गेला होता. या प्रसंगासाठी चिलखत खरा बनवण्यात आला आणि त्यासाठी वेशभूषा टीमला जवळपास २ आठवडे लागले होते. आणि महत्वाचं त्या वेळी प्राजक्तानेही तो सिन उत्कृष्टरित्या साकारला होता.

प्राजक्ताने मालिकेसाठी घोडेस्वारी सोबतचं तालवारबाजीचं प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे. प्राजक्ताने अनेकदा हे मतही व्यक्त केलयं की, या मालिकेचे मानावे तितके आभार कमीच आहेत; कारण याच मालिकेने आजवर संभाजी राजांचा असलेला खरा इतिहास समोर मांडला. प्राजक्ता ही वयाने बरीच लहान असून तिने इतकी अवघड भूमिकेचं ओझं ते संपेपर्यंत बाळगून जे काम केलं त्याला नक्कीच तोड नाही असचं म्हणावं लागेल. नुकताच प्रेक्षकांमधे प्राजक्ताचा एक जुना व्हिडीओदेखील व्हायरल झालेला आहे. ज्यात तिने अत्यंत बखुबीने काठी फिरवली आहे. सध्या प्राजक्ता गायकवाडवर या भुमिकेसाठी कौतुकाची वेगळी थाप नक्कीच सोडलीये असं म्हणायला हरकत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment