शिवीगाळ कोणी केली उघड करण्यासाठी भास्कर जाधवांची नार्को टेस्ट करा, ‘या’ भाजप आमदाराची मागणी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: ओबीसी आरक्षण मुद्दयावरुन आज पावसाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी सभागृहात तूफान गदारोळ झाला. त्यानंतर गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळे राज्यातील वातावरण गरम झाले असून, सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये तूफान शेरेबाजी सुरू झाली आहे.

सभागृहात झालेल्या गोंधळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारात धक्काबुक्की झाली. तसेच तालिका अध्यक्षांच्या दालनातही मोठा राडा झाल्याचे कळते. अध्यक्षांच्या दालनात येऊन भाजप आमदारांनी धक्काबुक्की करत आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी लावला होता.

भास्कर जाधव यांच्या आरोपांना उत्तर देत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, “विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे, ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे. शिवीगाळ करण्याचा इतिहास कोणाचा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.”

निलंबन झालेल्या 12 आमदारांमध्ये अतुल भातखळकर यांचा ही समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईनंतर त्यांनी इतर आमदारासोबत राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल मागवण्याची मागणी केली.

See also  महाविकास आघाडी सरकारमध्ये विष कालवण्याचं काम करू नका, शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याला सल्ला

राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व सर्व कायदेशीर बाजू तपासून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. असं आशिष शेलार यांनी सांगितले आहे. तससेच ही कारवाई एकतर्फी झाली असून, महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे.  आम्हाला आमचं म्हणणं माडु देण्यात आलं नाही. आमच्या एकाही आमदाराने अपशब्द उच्चारले नाहीत. असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

या 12 आमदारांचे झालले निलंबन

अभिमन्यू पवार, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुंटे, आशिष शेलार, योगेश सागर, नारायण कुचे, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, पराग आळवणी, कीर्ती कुमार भांगडिया, हरिष पिंगळे या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन झाले आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment