प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विराट कोहलीला अटक होण्याची शक्यता? कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या दिवसांत अडचणींचा सामना करत आहेत. या दोघांना अटक करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांनी असे काय केले कि त्यांच्या विरोधात याचिका दाखल झाली? चला तर जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण…

मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नईच्या वकिलाने तमन्नाह भाटिया आणि विराट कोहली यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकिलांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की तमन्ना आणि विराट त्यांच्या जाहिरातीद्वारे ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन मिळत आहे. तरुण पिढीला याचे व्यसन जडत असल्याने ऑनलाइन सट्टेबाजीवर बंदी घालण्यासाठी सूचना जारी करण्याचे आदेश कोर्टाने द्यावे असे त्या वकिलाने विनंती केली आहे.

ऑनलाइन सट्टेबाज कंपनी विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यासारख्या सेलिब्रिटींचा वापर करुन तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे, म्हणून
विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांना अटक करा असे याचिकाकर्त्याचे वकील म्हणाले. ऑनलाइन सट्टेबाजीत हरलेली रक्कम न भरल्यामुळे नुकत्याच एका युवकाने आ-त्म-ह-त्या केली या घटनेची दखल घेत वकिलांनी न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया मोबाइल प्रीमियर लीगची (एमपीएल) या कंपनीची जाहिरात करतात. ते दोघेही गेमिंग प्लॅटफॉर्मचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत.

See also  करण जोहर याचे 'से'क्स' बद्धल आहेत हे विचार; याच कारणामुळे शाहरुख खान सोबत करणचे नाव जोडले जाते...

एमपीएल या ऍपचे यावेळी 30 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून 40 हून अधिक खेळ आहेत. एमपीएलकडे आयपीएलपूर्वी सहा क्रिकेट गेम्स असून त्यामुळे वापरकर्त्यांना अधिक पर्याय उपलब्ध आहेत.

अशा ऑनलाइन गेममधून सट्टेबाजीला बरीच चालना मिळते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका पदवीधर विद्यार्थ्याने ऑनलाइन सट्टेबाजीमुळे स्वतःचे जीवन संपवले आहे. त्या विद्यार्थ्याने ऑनलाइन गेमिंगमध्ये 20 हजार रुपये गमावले होते. त्याला हे पैसे कसे फेडावे कळत नव्हते व त्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने त्याचे जीवन संपवले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  सलमानला त्याच्या कुटुंबापासून वेगळे करणार होती ऐश्वर्या राय, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment