तान्हाजी चित्रपटात दिग्दर्शकाला जोकर दाखवायचे होते, पण मला काही तरी वेगळं दाखवायचे होते, सैफ अली खान ने केला खुलासा
तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाने बॉलीवूड मधील अनेक विक्रम मोडीत काढले. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने प्रचंड कमाई केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावान मावळे सरदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट महाराष्ट्रात तर प्रचंड लोकप्रिय ठरला. परंतु आता काही दिवसांपूर्वी सैफ अली खान याने या चित्रपटाबद्दल बोलताना असं काहीतरी वक्तव्य केले आहे की त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण ज्यामुळे बॉलिवूडमध्ये एवढी खळबळ उडालेली आहे…..
तानाजी चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या पसंतीस उतरला परंतु आता सैफ अली खान असे म्हणत आहे की त्याला या चित्रपटाच्या पात्राबाबत नवीन काहीतरी प्रयोग करायची इच्छा होती, परंतु दिग्दर्शक ओम राऊत यांना मात्र सैफ अली खान याने जोकर ( कदाचित हॉलिवूडमधील ) सारखी भूमिका करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे नवीन काही प्रयोग करायच्या ऐवजी सैफ अली खान ने देखील दिग्दर्शकाला अपेक्षित भूमिका न ठेवण्याचा निर्णय घेतला परंतु अशी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी फार अभ्यास आवश्यक असतो तुम्ही हळूहळू व्यक्तिरेखेचे सोबत एकरुप होता कारण प्रत्येक व्यक्तिरेखेची एक विशिष्ट शैली असते यावेळी देखील या शैलीला आत्मसात केल्यानंतरच शूटिंगला होकार दिला.
सैफ अली खान आपल्या दिग्दर्शकाचे कौतुक करताना म्हणाला की मी ओम राऊत यांचे खूप आभार मानतो त्यांनी माझा हात पकडून त्या रोल कडे मला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत मी अजय देवगन चा धन्यवाद म्हणतो कारण त्याने या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळवून दिली. हा चित्रपट म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जागृती होय त्यामुळे या चित्रपटात काम करताना मला प्रचंड आनंद झाला.
तुम्हाला आठवत असेल तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी सैफ अली खान याने चित्रपटात मूळ कथेशी छेडछाड झाल्याचे सांगितले होते, तेव्हादेखील बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. त्याचे हे विधान देखील खूप व्हायरल झाले होते सैफ अली खानच्या या वक्तव्यामुळे अजय देवगन देखील प्रचंड नाराज झाला होता. या चित्रपटात सैफ अली खान याने मुख्य खलनायकाची भूमिका स्वीकारली आहे, उदयभान ची भूमिका स्वीकारताना सैफ अली खानला प्रचंड मेहनत करावे लागले होती.