तानाजी चित्रपटाने २६ व्या दिवशी मोडला बाहुबली या सुपरहिट चित्रपटाचा हा रेकॉर्ड!

तान्हाजी-द अनसंग वाॅरीअर चित्रपट नुकताच 10 जानवारी रोजी रिलीज झाला आणि तो प्रेक्षकांवर फार उत्तमरित्या ऐतिहासिक कथेची भुरळ पाडतोय. वीर बाजी तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची बाॅक्स आॅफीसवर घौडदौड वेगात सुरूच आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे.

अलीकडे रिलीज झालेले ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’,‘पंगा’, ‘जवानी जानेमन’ हे सिनेमेही ‘तान्हाजी’ची घोडदौड थांबवू शकले नाहीत. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत, या चित्रपटाने एकापाठोपाठ एक नवनवे विक्रम रचण्याचा धडाका लावला आहे. कमाईच्या बाबतीत ‘तान्हाजी’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. आता तर या चित्रपटाने ‘बाहुबली 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्डही तोडला आहे. होय, 26 व्या दिवशी दुपारी 3 वाजता ‘तान्हाजी’ने ‘बाहुबली 2’ने रचलेला विक्रम मोडीत काढला.

See also  हे आहेत बॉलिवूड मधील सर्वात मोठे वा'द'वि'वा'द ज्यामुळे सोशल मीडियासह देशभरात उ'डा'ली होती ख'ळबळ...

maxresdefault 1

ओम राऊत दिग्दर्शित, अजय देवगण निर्मित हा ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत काजोल मुख्य भूमिकेत आहेत.

26 व्या दिवसापर्यंत ‘बाहुबली 2’ला 0.13 कोटींचे आगाऊ बुकिंग मिळाले होते. आता 26 व्या दिवशी ‘तान्हाजी’ला 0.18 कोटींचे आगाऊ बुकिंग मिळाले आहे. हा एक विक्रम आहे. ‘तान्हाजी’ने आत्तापर्यंत भारतात सुमारे 257 कोटींची कमाई केली आहे. गत मंगळवारी 26 व्या दिवशी ‘तान्हाजी’ने 2.05 कोटींची कमाई केली. 27 व्या दिवसांचा अधिकृत आकडा अद्याप यायचा आहे. पण या दिवसाची कमाईही 2 ते 3 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे.

‘तान्हाजी’ने फक्त मुंबईत 130 कोटी रूपये कमावले आहेत. यापूर्वी सलमानच्या ‘दबंग’ने मुंबईत 104 कोटींचा गल्ला जमवला होता. म्हणजेच ‘तान्हाजी’ने सलमानच्या ‘दबंग’चाही विक्रम मोडला आहे. ही घोडदौड बघता येत्या काही दिवसांत ‘तान्हाजी’ने 300 कोटींचा आकडा पार केला तर आश्चर्य वाटायला नको. ‘तान्हाजी’मध्ये अजय देवगणने नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.

See also  सलमान खानच्या वडिलांनी सांगितले त्याच्या लग्न न करण्यामागचे कारण, ऐकून विश्वासच बसणार नाही!

 

Leave a Comment

close