कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे बॉलीवूड मधील क्वीन अभिनेत्री तापसी पन्नू, संपत्तीची रक्कम जाणून घ्या…
बॉलिवूड मध्ये सध्या एक अभिनेत्री अशी आहे की जिच्या संपत्ती बद्दल ऐकूण आपण थक्क व्हाल. कारण ती आधी फार लोकप्रिय नव्हती; पण हळूहळू तिच्या कामाने आणि अभिनयाने वेग घेतला. चाहत्यांना आवडायला लागला आणि आज ती सुपरस्टार अभिनेत्री आहे. लोकप्रिय आहे खूप.
तिचं नाव आहे तापसी पनू. ज्या तापसी बद्दल पडद्यावर असलेल्या गोष्टी च फक्त आपल्याला माहीत असतील; पण तिच्या एकूण संपत्ती बद्दल कुणाला माहितेय ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात की नेमके किती कमावते.
आज या लोकप्रिय अभिनेत्री ने बॉलिवूड मध्ये स्वतःच एक हक्काचं असं वेगळंच स्थान निर्माण केलेलं आहे. तिचा १ ऑगस्ट रोजी तिचा ३४ वा वाढदिवस साजरा तिने केला. या वाढदिवसाला तिला अनेकांच्या शुभेच्छा आल्या. इंडस्ट्री मधल्या आणि चाहत्यांनी सुद्धा. तिला सुरुवातीला बॉलिवूड मध्ये फार त्रास झाला. बॉलिवूड पदार्पणानंतर अनेक टोमणे ऐकणाऱ्या तापसीने तिच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचं शिखर सर केलं आहे. बॉलिवूडमधील हिट अभिनेत्री असणाऱ्या तापसीची महिन्याची कमाई लाखोंमध्ये आहे. कारण तिचे प्रत्येक सिनेमे आता हिट आहेत. गाजत आहेत.
तापसी पनू या अभिनेत्री ने तरीही नाही म्हणलं तरी खूप कमी वयात या इंडस्ट्रीत काम केलेलं आहे. आणि तेही जम बसवून उत्तम. आज तापसी ही 30 च्या घरात आहे. १९८७ साली दिल्लीमध्ये जन्मलेल्या तापसीने अभियांत्रिकीचा अभ्यास सोडून मॉडेलिंगमध्ये करियर करायचं ठरवलं. अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करत तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. तापसीने सुरुवातीला अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं.
परंतु, तापसीने काम केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे तापसीला फ्लॉप हिरोंची हिरोईन असे टोमणे मिळू लागले. कारण सुरुवातीला होत असत असे. पण तेच यश समजून किंवा अपयश समजून माघार नसते घ्यायची जी तापसी मे कधीच घेतली नाही. ज्याचं फळ तिला एवढे मोठे मिळाले.
तिचे बॉलिवूड पदार्पण कसे झाले हेही खूप महत्वाचे आहे. चला तेही जाणून घेऊयात. तापसीने जिद्दीने बॉलिवूड पदार्पण करायचं ठरवलं. ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटातून तापसीने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर तापसीने मागे वळून पाहिलं नाही. ‘बेबी’ चित्रपटातील तापसीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.
त्यानंतर तापसीने ‘पिंक’, ‘नाम शबाना’, ‘जुड़वा 2’, ‘मुल्क’, ‘मनमर्जियां’, ‘बदला’, ‘मिशन मंगल’, ‘सांड की आंख’, ‘थप्पड़’ आणि ‘हसीन दिलरुबा’ यांसारख्या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आज पर्यंत तिचे बरेच सिनेमे गाजले. तिनेही उत्कृष्ट असे काम केलेले आहे. तिच्या अभिनय शैली मुळे एक नवी पद्धत समोर आलेली आहे. तिला खूप चाहते सोशल मीडिया वर फोल्लो पण करतात.
आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की तिच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे ? तिने आज पर्यंत खूप कोटीने कमाई केलेली आहे. तापसीच्या संपत्तीबद्दल सांगायचं तर तापसी जवळपास ४४ कोटी रुपयांची मालकीण आहे. ती प्रत्येक महिन्याला ३० लाखांच्या आसपास कमाई करते. तर प्रत्येक वर्षाला चार कोटी रुपयांची कमाई करते. चित्रपटांसोबतच तापसी एका ब्रॅण्ड प्रमोशनद्वारे दोन कोटींची कमाई करते.
यासोबतच तिने अनेक ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. तापसीकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्यादेखील आहेत. याशिवाय मुंबईत तापसीच्या मालकीची तीन घरं आहेत. त्यातील एका तीन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये तापसी स्वतः राहते. तर तापसी बऱ्यापैकी श्रीमंत आज आहे. अजूनही तिचे कामे चालूच आहेत. पैसे येतच आहेत. ती दुसरीकडे ही सतत गुंतवणूक करत आहे. अश्या हरहुन्नरी अभिनेत्री ला तिच्या पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.